शेतकर्‍यांसाठी प्रहारचे निवेदन

0
21

गोंदिया : अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव तालुक्यातील रब्बी पिकाची पावसामुळे हाणी झाली. शेतकर्‍यांना मदत करण्याचे निवेदन रवि भवन नागपूरच्या कार्यालयात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभियेसह अनेक शेतकर्‍यांनी आ. बब्चू कडू यांना दिले. शेतकर्‍यांच्या समस्येचे निराकरण करण्याची मागणी निवेदनात केली आहे. खरेदी केंद्र उशीरा उघडल्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे धान्य पडून आहे. परिणामी पडक्या किमतीत धान्य विक्री करावे लागत आहे. शेतकर्‍यांना वेळेवर कालव्याचे पाणी देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहेत. याकडे शासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी गोंदिया प्रहार संघटनेने बच्चू कडू यांना निवेदन दिले.निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात मनोहर राऊत, प्रशांत कठाणे, सिध्दार्थ शेंडे, राजेश शेंडे, अरूण भांडारकर, झामाजी चौरीवार, प्रमोद तिराले, नेता रहांगडाले, ढेकणलाल रहांगडाले, किसन अंबुले, निताराम भोयर, अशोक तिलगाम, भारती मेश्राम, मोरेश्‍वर भोंडे, मुन्ना उके, प्रशांत मेश्राम, देवेंद्र बघेले, सलमान पठाण, रोहीत ठाकुर, सोनू अन्ना मानकर, अर्जना जुनेदार व मन्नू भिमटे उपस्थित होते.