बुध्दिस्ट टुरिस्ट सर्किट एकमेकांशी जोडले जातील

0
8

नागपूर : दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस व चिचोली येथील डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचे वस्तू संग्रहालय ही तीनही धार्मिक स्थळे बुध्दिस्ट टुरिस्ट सर्किट म्हणून एकमेकांशी जोडले जातील, असे नियोजन करा. तसेच या तीनही स्थळांच्या सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव नव्याने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

या तीनही धार्मिक स्थळांचा विकास आणि सौंदर्यीकरणासंदर्भात एक बैठक रवीभवनात पालकमंत्र्यांनी आज घेतली. या बैठकीला माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, आमदार प्रकाश गजभिये, सुधारक देशमुख, समीर मेघे, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले, विलास गजघाटे, विजय चिकाटे आदी उपस्थित होते.

दीक्षाभूमी ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. विकास कामांची जबाबदारी नागपूर सुधार प्रन्यासकडे आहे. 325 कोटींचा खर्चाचा विविध कामांचा आराखडा तयार करण्यात आला. दीक्षाभूमी परिसर 22.8 एकर जागेत आहे. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.