नगर योग उत्सव समितीची सभा शनिवारला

0
30

गोंदिया : आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सव एकत्रितरित्या साजरा करण्याच्या नियोजनकरीता ११ जून रोजी नगर योग उत्सव समितीची सभा सकाळी साडेआठ वाजता योग मित्र मंडळाच्या सभागृहात, जुने आरटीओ कार्यालयाजवळ सिव्हिल लाईन गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे.
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस भव्य स्वरूपात व एकतेचा संदेश देणारा व्हावा, या उद्देशाने शहरातील समस्त योग संघटनांची एक संयुक्त सभा नुकतीच योग मित्र मंडळाच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगर योग उत्सव समितीचे गठण करण्यात आले. दरम्यान, २१ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सर्व संघटनेच्या सहभागाने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला अखिल विश्व गायत्री परिवार, आरोग्य भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, हार्टफूलनेस इंस्टिट्यूट, पतंजली योग पीठ, रामकृष्णा सत्संग मंडळ, योग मित्र मंडळ आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्सवाच्या नियोजनासाठी ११ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता नगर योग उत्सव समितीची सभा आयोजित करण्यात आली असून, शहरातील अन्य योग संघटनांनीही या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन नगर योग उत्सव समितीचे अध्यक्ष विष्णू अग्रवाल व सचिव डॉ. प्रशांत कटरे यांनी केले आहे.