सडक अर्जुनी प.स.घोटाळाप्रकरणात दोन बीईओसह बँक मॅनेजरला अटक

0
10

गोंदिया,दि.11- गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येणार्या सडक अर्जुनी पंचायत समितीमध्ये शिक्षकांसह इतरांच्या पैसाची अफरातफर झाल्याचे सर्वात आधी वृत्त बेरार टाईम्स ने प्रकाशित केले होते.त्या घोटाळ्या प्रकरणात मुख्य आरोपी असेलला सुनिल पटले याला अटकपुर्व जामिन मिळाला असला तरी त्यावेळचे गटशिक्षणाधिकारी आणि ज्या बँकेतून ही रक्कम परस्पर पटले यांच्या खात्यावर वळती करण्यात आली,त्या बँकेच्या मॅनेजरसह 4 जणांना शुक्रवारला डुग्गीपार पोलीसांनी अटक केली आहे.यामध्ये गटशिक्षणाधिकारी पदावर राहिलेले श्री सोयाम व श्री मेश्राम यांचाही समावेश आहे.यापैकी एकाने प्रकृती अस्वस्थेचे कारण पुढे करुन रुग्णालय गाठले असून गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.रुग्णालयात उपचाराच्या नावावर भरती राहून जामीन मिळविण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे. पंचायत समितीमध्ये  १ कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा घोटाळा ल असल्याचे चौकशी समितीने प्रशासनाला कळविले होते.त्यानंतर डुग्ीपार पोलीसात तक्रार नोंदविण्यात आली होती.त्या चौकशीमध्ये उपशिक्षणाधिकारी ,कक्ष अधिकारी,लेखा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.