पुरोगामी शिक्षक समितीच्या विभागीय अध्यक्षपदी राजेश दरेकर

0
15

गडचिरोली, – येथील नगर परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश दरेकर यांची संघटनेच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चिपळूण येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत श्री.दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन दरेकर यांचा सन्मान केला. यावेळी राज्य सरचिटणीस विजय भोगेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल हरीश ससनकर, दीपक वर्हेकर (चंद्रपूर), सुधीर गोहणे, शेडमाके (गडचिरोली) मनिष राठोड, आनंद शेंडे(यवतमाळ), शत्रुघ्न गवळी(वाशिम), लीलाधर सोनवणे, विनोद गवारले(नागपूर), ई.ल.ढेंगे, रमेश पारधीकर (भंडारा), हरिराम येलणे(गोंदिया) आदींनी राजेश दरेकर यांचे अभिनंदन केले आहे.