संविधानविरोधी वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

0
8

गोंदिया : इंदिरा गांधी नॅशनल सेंटर आॅफ आर्ट्सचे (आयजीएनसीए) अध्यक्ष व एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादूर रॉय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान याबाबत चुकीचे वक्तव्य केले. बाबासाहेबांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या असून रॉय यांच्यावर राष्ट्रद्रोह व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आयजीएनसीएचे अध्यक्ष रामबहादूर रॉय यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेच नाही. त्यांनी केवळ संविधानाची भाषा दुरूस्ती केली, असे बेताल व्यक्तव्य केले. तसेच भारतीय संविधानाला आग लावायला कुणी सांगितले तर सर्वप्रथम मी आग लावेन, असे ते बोलले.डॉ. आंबेकरांबद्दल बेताल व्यक्तत्व केल्यामुळे व अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावून धार्मिक भावना भडकविल्याबद्दल त्यांच्यावर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गतचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच आयजीएनसीएच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने निवेदनातून केली आहे.याप्रसंगी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विशाल शेंडे, श्याम चौरे, लक्ष्मीकांत डहाटे, इसुलाल भालेकर, किशोर मेश्राम, राजीव दोनोडे, अनिल गेडाम, बाबा जांगडे, सुरेश नागदेवे, सूर्यकांत डोंगरे, विवेक मौजे, मनोज वालदे, रतन वासनिक, पी. कामदे, डी.आर. वैद्य, सुनील शहारे, चुन्नीलाल मुटकुरे, अनिल डोंगरे, सुशील ठवरे, देवा रूसे, जगदीश वासनिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.