उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी अस्वलाची भटकंती

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.19-उष्ण कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.मानवाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील बोरटोला शिवारातील बोरटोला – इंजोरी मार्गाजवळील  खांबी येथील मळेघाट देवस्थान पहाडीवर रोजगार हमीचे काम सुरू असतांना कामावरील मजूरांना सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास अस्वल दिसल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले.त्या ठिकाणी असलेल्या नाल्यावर आपली तृष्णा भागविण्यास आलेली अस्वल थोडी मानवी आरडाओरड झाल्यावर तिथून निघून गेली.मात्र तिथे उपस्थित असलेल्यांनी  मोबाईलच्या कॅमेरात दृष्टीस पडलेल्या अस्वलीला टिपले.