वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0
4

अर्जुनी मोरगांव,दि.१५- येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. देशातील लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणि स्वाभिमानाने जगायला शिकवणारे व देशाला प्रगतिशील करण्यासाठी संविधानरुपी संजीवनी देणाऱ्या महानुभाव,भारतीय राज्यघटनेचे आदर्श शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ता.१४ एप्रिल ला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवजी सलामे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव ॲड.सुरज रंगारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोरजी तागडे, वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका उपाध्यक्ष दिपेंद्र ऊके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.