जिल्ह्यात सरासरी ९६ मि.मी.पाऊस

0
10

गोंदिया,दि.२९ : जिल्ह्यात १ ते २९ जून २०१६ या कालावधीत ३१६७.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९६ मि.मी. इतकी आहे. आज २९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६६८.७ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी २०.३ मि.मी. इतकी आहे.
२९ जून रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया ६५ मि.मी. (९.३) , गोरेगाव तालुका- ५०.४ मि.मी. (१६.८), तिरोडा तालुका- ४०.१ मि.मी. (८.०), अर्जुनी मोरगाव तालुका- २१७.४ मि.मी. (४३.५), देवरी तालुका- ५२ मि.मी. (१७.३), आमगाव तालुका- १०५.६ मि.मी. (२६.४), सालेकसा तालुका- १०८.६ मि.मी. (३६.२) आणि सडक अर्जुनी तालुका- २९.६ मि.मी. (९.९) असा एकूण ६६८.७ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २०.३ मि.मी. इतकी आहे.