वृक्षाचे संगोपन लेकराप्रमाणे व्हावे – आमदार नाना शामकुळे

0
8

चंद्रपूर,दि.01 : केवळ वृक्षारोपणच नव्हे तर त्याचे संवर्धन व संगोपन लेकराप्रमाणे व्हावे असे मत आमदार नानाजी शामकुळे यांनी शहरात विविध ठिकाणी ” वृक्षारोपण” करताना व्यक्त केले.
आज 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हा कोणताही इव्हेंन्ट नसुन पर्यावरण् रक्षणाचे हे एक मिशन आहे. या प्रक्रियेत वृक्ष लावणे एवढीच आपली जबाबदारी नसुन त्यांचे संवर्धन करणे, जोपासणा करणे ही महत्वाचे आहे. असे आवाहन आमदार नाना शामकुळे यांनी केले .
शहरात विविध ठिकाणी ” वृक्षारोपण” करण्यात आले. त्यात सकाळी आठ वाजता जिल्हा कारागृह येथे आमदार शामकुळे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी कारागृह अधीक्षक महल्ले, जाधव व कर्मचारी वृदाची उपस्थिती होती. सकाळी साडेआठ वाजता शहर महानगर पालिका येथे आमदार शामकुळे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त इगोले आदी मान्यवर उपस्थित होते. वन प्रबोधिनी येथे वन विभागातर्फे वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, वन विभागातील वरिष्ठ अधिकारी संजय ठाकरेजी , धाबेकरजी , हिरेजी यांची उपस्थिती होती.
सकाळी नऊ वाजता मातोश्री मंगल कार्यालयाजवळून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुकूम परिसरातील शेकडो नागरिकांची उपथिती होती. यावेळी सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका मायाताई उईके, रत्नमालाताई वायकर, नामदेव डाहुले, द्विवेदि महाराज, प्रमोद शास्त्रकार, अमीन शेख, विठ्ठलराव डुकरे, परमेश्वर हजारे, पुरुषोत्तम सहारे, राहुल वीरूटकर, शिलाताई चव्हाण, मंजुश्री कासनगोट्टूवार, गुडडेताई, गुरुदेव सेवामंडळाचे सदस्यगण, मातोश्री महाविद्यालयाचे विद्यार्थी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.