जिल्हा परिषदेने लावले जिल्ह्यात1 लाख 38 हजार वृक्ष

0
23

गोंदिया,दि.02-गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येणार्या 8 पचांयत समितीसह ,पंचायत विभाग,लघुपाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग,पशुसंवर्धंन विभाग,कृषी विभाग,बांधकाम विभाग,आरोग्य विभाग व शिक्षण विभाग मिळून जिल्ह्यातील विविध गावामध्ये 1 लाख 38 हजार 566 झाडे 2 कोटी वृक्षलागवड मोहीमेंतर्गंत 1 जुले् रोजी लावण्यात आल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी बेरार टाईम्सला दिली.मुकाअ डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेढे,उपाध्यक्ष रचना गहाणे,सभापती पी.जी.कटरे,देवराज वडगाये,विमल नागपूरे आणि छाया दसरे,अति.मुकाअ जयंवत पाडवी यांच्या मार्गदर्शनात ही लागवड करण्यात आली.अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार यांनी यात आघाडी घेतली जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यापेंक्षा सर्वाधिक 11 हजार 95 हजार वृक्षारोपण आपल्या तालुक्यात त्यांनी केले.आमगाव पंचायत समितीने 5 हजार 742,देवरी पंचायत समिती 6310,गोंदिया पंचायत समितीतर्गंत 10 हजार 900,गोरेगाव पंचायत समिती 5600,सालेकसा पंचायत समिती 4200,सडक अर्जुनी पंचायत समिती 6360 आणि तिरोडा पंचायत समितीमध्ये 9667 झाडे लावण्यात आली.लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने 5010,शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग 64793,महिला बालकल्याण विभाग 4224,बांधकाम विभाग 300 ,पशुसंवर्धंन विभाग 897 आणि आरोग्य विभागाच्यावतीने 3468 झाडे अशी एकुण 1 लाख 36 हजार 566 झाडे लावण्यात आली आहेत.