न.प.प्रभागांचे आरक्षण जाहीर

0
10

गोंदिया : शहरातील प्रभागांच्या आरक्षणाची सोडत शनिवारी (दि.२) येथील नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली. या सोडतीमध्ये नियमानुसार महिलांसाठी ५0 टक्के जागा म्हणजेच २१ जागा सोडण्यात आल्या. अनुसूचित जातीसाठी ८ तर अनुसूचित जमातीसाठी १ जागा आरक्षित करण्यात आली आहे.आरक्षणाची चिठ्ठी साविका गजभिये नामक चिमुकलीच्या हस्ते काढण्यात आली. चिठ्ठी काढून उर्वरीत जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
येत्या डिसेंबर महिन्यात नगर परिषदेच्या निवडणूका येत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरात एक प्रभाग वाढविण्यात आला असून त्यामुळे दोन सदस्य वाढणार आहेत. अशा प्रकारे शहरात एकूण २१ प्रभाग होत असून ४२ सदस्य राहतील. तसेच नगर परिषदेने प्रभाग रचना करून प्रारूप प्रभार रचना जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली आहे. हे सर्व होत असतानाच प्रभागातील जागांच्या आरक्षणाला घेऊन मात्र शहरवासीयांत उत्सुकता होती. शनिवारी (दि.२) झालेल्या आरक्षणाच्या सोडतीमुळे मात्र त्यांची उत्सुकता सरली.
शनिवारी नगर परिषद सभागृहात उप विभागीय अधिकारी के.एन.के.राव, अपर तहसीलदार के.डी.मेश्राम व मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये शहरातील २१ प्रभागातील ४२ जागांसाठी ‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटांसाठी सोडत काढण्यात आली. यात ‘अ’ गटातील जागा अनू.जाती (एस.सी.) अनू.जमाती (एस.टी.) व नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव ठेवण्यात आली. तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये कोणतेही आरक्षण नसल्याने सदर प्रभागात एक महिला सर्वसाधारण व एक सर्वसाधारण जागा निश्‍चीत करण्यात आली.
सन २0११ मधील जनगणनेच्या आधारावर तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार यात अनू.जातीसाठी ८, अनू.जमातीसाठी १ तर २७ टक्के अरक्षणानुसार ओबीसींसाठी ११ जागांचे आरक्षण निश्‍चीत करण्यात आले. यात अनू.जातीच्या ८ जागांपैकी ४ जागा महिलांसाठी सोडतीद्वारे काढण्यात आल्या. अनू. जमातीमध्ये १ जागा असल्याने त्याची सोडत काढण्यात येवून सदर जागा चिठ्ठीद्वारे अनू. सर्वसाधारणसाठी निश्‍चीत करण्यात आली. तर ओबीसी करिता एकूण ११ जागांपैकी ६ जागा महिलांसाठी चिठ्ठीकाढून निश्‍चीत करण्यात आल्या. त्यानंतर उर्वरीत जागा निश्‍चीत करण्यात आल्या.

तिरोडा : येथे काढण्यात आलेल्या न.प.च्या ८ प्रभागांच्या आरक्षण सोडतीत सर्वाधिक ४ प्रभाग ओबीसी प्रवर्गासी राखीव झाले. ३ अनुसूचित जातीसाठी तर १ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला. सोडतीप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तहसीलदार रविंद्र चव्हाण, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होते. नगर परिषदेच्या सभागृहात मोठय़ा संख्येने उपस्थित नागरिकांसमोर ही सोडत काढण्यात आली.

तिरोडा न.प.आरक्षणाचा तक्ता
प्रभाग क्र. ‘अ’ गट ‘ब’ गट
१ अनू.जाती (म) सर्वसाधारण
२ अनू.जाती सर्वसाधारण (म)
३ अनू.जाती (म) सर्वसाधारण
४ इतर मागास सर्वसाधारण (म)
५ इतर मागास इतर मागास (म)
‘क’ गट सर्वसाधारण(म)
६ इतर मागास (म) सर्वसाधारण
७ इतर मागास (म) सर्वसाधारण
८ अनू.जमाती (म) सर्वसाधारण

गोंदिया-प्रभागनिहाय आरक्षणाची स्थिती
प्रभाग ‘अ’ गट ‘ब’ गट
१ इतर मागास (म) सर्वसाधारण
२ इतर मागास सर्वसाधारण (म)
३ अनु.जाती सर्वसाधारण (म)
४ सर्वसाधारण (म) सर्वसाधारण
५ अनु.जमाती सर्वसाधारण (म)
६ इतर मागास सर्वसाधारण (म)
७ इतर मागास (म) सर्वसाधारण
८ इतर मागास (म) सर्वसाधारण
९ इतर मागास सर्वसाधारण (म)
१0 इतर मागास सर्वसाधारण (म)
११ इतर मागास (म) सर्वसाधारण
१२ इतर मागास (म) सर्वसाधारण
१३ अनु.जाती सर्वसाधारण (म)
१४ अनु.जाती (म) सर्वसाधारण
१५ अनु.जाती (म) सर्वसाधारण
१६ अनु.जाती सर्वसाधारण (म)
१७ अनु.जाती सर्वसाधारण (म)
१८ अनु.जाती (म) सर्वसाधारण
१९ इतर मागास सर्वसाधारण (म)
२0 अनु.जाती (म) सर्वसाधारण
२१ इतर मागास (म) सर्वसाधारण