जिल्ह्यात सरासरी १८७.७ मि.मी.पाऊस

0
12

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात १ जून ते ४ जुलै २०१६ या कालावधीत ६१९५.१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १८७.७ मि.मी. इतकी आहे. आज ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९३५.५ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी २८.३ मि.मी. इतकी आहे. ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १०२ मि.मी. (१४.५) , गोरेगाव तालुका- ८३.८ मि.मी. (२७.९), तिरोडा तालुका- २८४.७ मि.मी. (५६.९), अर्जुनी मोरगाव तालुका- ७८.२ मि.मी. (१५.७), देवरी तालुका- ११५ मि.मी. (३८.४), आमगाव तालुका- ११६.६ मि.मी. (२९.१), सालेकसा तालुका- ५६ मि.मी. (१८.६) आणि सडक अर्जुनी तालुका- ९९.२ मि.मी. (३३.१) असा एकूण ९३५.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २८.३ मि.मी. इतकी आहे.