किशोर दर्डाला एक दिवसाची पोलीस कोठडी

0
9

यवतमाळ,दि.04-येथील जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना आज पहाटे अटक करण्यात आली.तसेच न्यायालयात हजर करुन न्यायालयाने किशोर दर्डा यांना एक दिवसाची पोलीस कोठ़डी सुनावली आहे.
यवतमाळ पब्लिक स्कूलच्या दोन शिक्षकांनी विद्यार्थींनींचं लैगिंक शोषण केल्याचं उघडकीस झाल्यानंतर पालकवर्ग आणि नागरिक आक्रमक झाले होते. संतप्त जमावानं काँग्रेस नेते विजय दर्डा यांच्या विकासकामांच्या फलकांची तोडफोड केली. रस्त्यावर टायरही पेटवून देण्यात आले. मुख्याध्यापक दाससह किशोर दर्डा यांच्यावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.माजी खासदार विजय दर्डा अध्यक्ष असलेल्या जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी शाळकरी विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. संतप्त महिला पालकांनी किशोर दर्डा यांच्या घरासमोर बांगड्या फोडल्या. हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असल्याने वातावरण नियंत्रित करण्यासाठी त्यानंतर या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.त्यातच अाज अकोला व अमरावती येथे जिजाऊ महिला ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करुन कारवाईची मागणी करण्यात आली.