मनरेगातून तयार 22 लाखाचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेला…

0
8

?>बेरार टाईम्स विशेष
गोंदिया,दि.06-देवरी तालुक्यातील इस्तारी ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेर्तंगत तयार करण्यात आलेला २२ लाख रुपयांचा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे २६ जून रोजी उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पुलाचे बांधकाम हे तांत्रिक काम असताना मग्रारोहयोर्तंगत ग्रामपंचायतीने कसे केले? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे, मग्रारोहयोच्या अभियंत्यांनी बांधकाम सुरु असताना साहित्याची गुणवत्ता तपासली की नाही हा प्रश्न प्रशासनाला विचारला जात आहे.
अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागात २२ लाख रुपयाचा पूल वाहून गेल्याने शासनाचा निधीचा एकप्रकारे अपहारच झाल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. देवरी तालुक्यातील एक पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संबंधित विभाग आणि कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले आहे. परिणामी आदिवासी,अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात शासकीय निधीची विल्हेवाट कंत्राटदार व अधिकारी असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. इस्तारीचे ग्रामसेवक जी.डी.चारथळ यांनी मग्रारोहयोतून हे काम झाल्याचे कबुल करीत पूल वाहून गेल्याचे सुद्धा मान्य केले. मात्र, कंत्राटदारावरील कारवाई संदर्भात विचारताच ते ते काहीही बोलले नाही. यामध्ये मग्रारोहयोच्या ज्या अभियंत्याने तांत्रिक मंजुरी देऊन कामाची पाहणी केली असेल त्या अभियंत्याच्या चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी महिन्यात देवरी तालुक्यातील %