जनसेवेकरीता लायन्स क्लबला सर्वतोपरी मदत करणार – ना. बडोले

0
9

– लायन्स क्लब राईस सिटीचा शपथविधी कार्यक्रम
गोंदिया – लायन्स क्लब ही संस्था नेहमीच समाजासाठी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवून गरजूंना मदत करण्याचे काम सतत करीत आहे. आपले व्यवसाय सांभाळून आपले समाजाला काहीतरी देणे आहे ही भावना जोपासून अनेक समाजसेवी संस्थेला जुडून आपले कर्तव्य पार पाडीत आहे. संस्थेद्वारे होत असलेले कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. लायन्स क्लब द्वारे गोंदिया जिल्ह्यात रुग्णांकरिता डायलिसिस साठी उपकरण व सोयी सुविधा पुरविण्या संदर्भात विचार व कार्य ठरविण्यात आले आहे, हे स्तुत उपक्रम आहे. अशा जनसेवेसाठी होत असलेल्या प्रत्येक कामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते हॉटेल पॅसिफिक मध्ये आयोजित लायन्स क्लब राईस सिटी च्या शपथ विधी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी प्रामुख्याने लायन्स चे प्रांतपाल विजय पालीवाल, माजी प्रांतपाल विनोद वर्मा, झोन चेअरमन शरद क्षत्रिय, अध्यक्ष नीलम बग्गा, सचिव अनिता राजू बिसेन, कोषाध्यक्ष अजितसिंग बग्गा उपस्थित होते. या वेळी लायन्स क्लब राइस सिटी च्या वर्ष २०१६-१७ करीता नवनियुक्त अध्यक्ष नीलम बग्गा यांच्या अध्यक्षतेखाली प्रांतपाल ला. विजय पालीवाल यांच्याद्वारे नवीन कार्यकारिणीला शपथ देण्यात आली. कार्यकारिणीत सचिवपदी अनिता बिसेन, कोषाध्यक्षपदाची अजितसिंग बग्गा यांनी तसेच इतर पदाधिकारी सतीश रायकवार, राजेश गज्जर, राजू बिसेन, पियुष अग्रवाल, प्रकाश पटेल, संतोष भेलावे, सतीश वढेरा, संदीप कडुकर, शशी वाधवा, प्रदीप जायस्वाल, प्रेमनारायण मूंदळा, पुष्पक जसानी, सुशील सिंघानिया, अजय जयस्वाल, भरत क्षत्रिय, वंदना साहू यांनी शपथ घेतली. या प्रसंगी माजी प्रांतपाल विनोद वर्मा यांनी आपल्या संबोधनातून गोंदियात गरीब व गरजू रुग्णांकरिता लायन्स क्लब हे शासनाच्या मदतीने डायलिसिस प्रकल्प राबविन्याकरीता प्रयत्नशील आहे. या संदर्भात सीएसआर व इतर निधी बाबत पालकमंत्री बडोले यांच्या समोर मदतीकरिता प्रस्ताव त्यांनी ठेवले. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र बग्गा यांनी करून आभार मानले. कार्यक्रमात प्रामुख्याने जगदीश मिश्रा, एड ओम मेठी, जयंत शुक्ला, नरेश साहू, समीर बनसोडे, संदीप कापगते आदी उपस्थित होते.