जिल्ह्यात सरासरी ३४८.६ मि.मी.पाऊस

0
11

गोंदिया,दि.११ : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै २०१६ या कालावधीत ११५०४.२ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३४८.६ मि.मी. इतकी आहे. आज ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १८९.६ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ५.७ मि.मी. इतकी आहे.
११ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १२ मि.मी. (१.७) , गोरेगाव तालुका- ४.७ मि.मी. (१.७), तिरोडा तालुका- ६९.४ मि.मी. (१३.९), अर्जुनी मोरगाव तालुका- ५१ मि.मी. (१०.२), देवरी तालुका- २१ मि.मी. (७.०), आमगाव तालुका- ३.८ मि.मी. (१.०), सालेकसा तालुका- १०.३ मि.मी. (३.४) आणि सडक अर्जुनी तालुका- १७.४ मि.मी. (५.८) असा एकूण १८९.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ५.७ मि.मी. इतकी आहे. हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार १३ जुलैपर्यंत सकाळी ८.३० वाजेपर्यंत विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने सतर्क राहून जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत स्थळी राहण्याची दक्षता घ्यावी. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.