राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम यांनी वन विभागाचा पदभार स्वीकारला

0
6

मुंबई, दि. 11 : राज्यातील वन क्षेत्राच्या विकासाबरोबरच
आदिवासी क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन उद्योग उभारुन स्थानिक
लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे तसे शासनाचे
उद्दिष्ट आहे, असे आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे
पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम यांनी आज येथे सांगितले.
आज मंत्रालयात राज्यमंत्री श्री. अत्राम यांनी वन विभागाचा
पदभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास
खारगे, वन अधिकारी श्री. तिवारी यांनी वन विभागाने प्रकाशित केलेले
पुस्तक देऊन राज्यमंत्र्यांचे स्वागत केले. श्री. खारगे यांनी वन
विभागाविषयी सविस्तर माहिती यावेळी दिली.
अत्राम म्हणाले की, गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात
स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊन वन आधारित बांबू उद्योग केंद्र,
प्रशिक्षण संस्था यासारखे उद्योग उभारणे आवश्यक आहे. या माध्यमातून
स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या भागात वन
आणि आदिवासी क्षेत्र अधिक आहे त्याच विभागाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी
माझ्याकडे दिली याचा आनंद आहे. अधिकाधिक चांगले काम करण्याचा माझा
प्रयत्न असेल असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.