सातव्या वेतन आयोगासाठी जि.प.कर्मचार्यांचे निदर्शने

0
13

गोंदिया,दि.11- केद्र सरकारने लागू केलेला सातवा वेतन आयोग राज्यसरकारी कर्माचार्यांनाही त्वरीत लागू करण्यात यावे यामागणीसाठी आज (दि.11)दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्रचे राज्य सहसचिव लिलाधर पाथोडे व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस शैलेश बैस यांचे नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. निदर्शन कार्यक्रमात जिल्हा परिषदेमधील सर्व विभागाचे सर्व सर्ववर्गीय कर्मचारी सहभागी झाले होते.सातवा वेतन आयोगाची अमलबजानी केंद्राप्रमाने तात्काळ लागु करण्यात यावी आणि इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याचे नावे निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांना देण्यात आले.तसेच 2 सप्टेंबरपासूनच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन ही करण्यात आले.