चिल्हाटीत टँक्टर उलटल्याने चालकाचा जागीच मूत्यु

0
11

गोरेगाव,दि.१३-तालुक्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या चिल्हाटी येथे शेतातील चिखल आटोपून ट्रक्टर बाहेर काढत असतांना देवचंद प्रितीलाल टेंभरे वय ३६ वर्ष यांचा बुधवारला धुर्यावरुन टॅक्टर काढतांना टॅक्टर पलटल्याने घटनास्थळीच मूत्यु झाल्याची घटना घडली.
टँक्टर चालक, मालक देवचंद टेंभरे हा स्वताच्या शेताची नागरणी करुन चिखल करण्यासाठी सकाळी ८ वाजता शेतात टक्टर घेवुन गेला नागरणी करुन चिखल झाल्यानंतर टक्टर बांदीतुन बाहेर काढत असतांनी टक्टर धु-यावर चढला यात टँक्टर उलटल्याने देवचंद टेंभरे याचा जागीच मूत्यु झाला. या घटनेची माहीती मूतकाचे वडील प्रीतीलाल टेंभरे यांनी पोलीस स्टेशनला दिली घटनेचे गांर्भीय ओळखुन घटनास्थळी पोलीस हवालदार प्रदीप गणविर शिपाईसह पोहचले पंचनामा करुन गोरेगाव येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करुन कुटुबिंयांना सोपविले.या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रदीप गणविर करीत आहेत