१३ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७८.४ मि.मी.पाऊस

0
11

गोंदिया,दि.१३ : जिल्ह्यात १ जून ते १३ जुलै २०१६ या कालावधीत १२४८७.६ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ३७८.४ मि.मी. इतकी आहे. आज १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४३३.७ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी १३.१ मि.मी. इतकी आहे.
१३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- ५९ मि.मी. (८.४), गोरेगाव तालुका- १९.६ मि.मी. (६.५), तिरोडा तालुका- ३१.२ मि.मी. (६.२), अर्जुनी मोरगाव तालुका- ८४.७ मि.मी. (१७.०), देवरी तालुका- १०५ मि.मी. (३५.०), आमगाव तालुका- १७.८ मि.मी. (४.५), सालेकसा तालुका- ३६.६ मि.मी. (१२.२) आणि सडक अर्जुनी तालुका- ७९.८ मि.मी. (२६.६) असा एकूण ४३३.७ ६मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १३.१ मि.मी. इतकी आहे.