आ.पुराम यांच्या हस्ते पशुपालकांना २६ मृत जनावरांचा मोबदला

0
8

देवरी,दि.15 :तालुक्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या पालांदूर-जमी. येथे २६ जून २0१६ ला चक्रीवादळ व नैसर्गिक विजेच्या तांडवामुळे २६ जनावरांचा इटियाडोह धरणार्‍या पायथ्याशी मृत्यू झाला होता. या घटनेची जाणीव आ.पुराम यांना होताच संबंधित पशुसंवर्धन विभागाला सदर घटनेची तत्काळ दखल घेऊन मृत जनावरांच्या पशुपालकांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी करता येणार, याचे निर्देश दिले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने २६ मृत जनावरांचा मोबदला पशुपालकांना आ. संजय पुराम यांच्या हस्ते धनादेशाद्वारे देण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीमुळे २६ जनावरांचा मृत्यू झाला होता. आ. पुराम यांचे निर्देश मिळताच पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. वर्‍हाडपांडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. कोळेकर, आमदारांचे प्रतिनिधी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राजू शाहू, महामंत्री कुलदिप लांजेवार व कृष्णदास चोपकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेची नोंद केली. तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीला व संबंधित विभागाला अहवाल पाठविण्यात आला.एका महिन्यातच त्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या कामात हजारांच्या अंकात धनादेशाचे वितरण आ. संजय पुराम यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय पालांदूर-जमी. येथे लाभार्थ्यांना करण्यात आले.
या वेळी सरपंच कावळे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य सविता पुराम, भाजपा वरिष्ठ नेते सुकचंद राऊत, भाजपा तालुका उपाध्यक्ष यशवंत गुरूनुले, भाजयुमोचे योगेश बिसनकर, माजी सभापती कामेश्‍वर निकोडे, उपसरपंच मुलचंद नाईक, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी डॉ. कोळेकर, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.राहुल वर्‍हाडपांडे, नायब तहसीलदार गुरुनुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे सदस्य, ग्रामवासी व पात्र लाभार्थी उपस्थित होते.