ब्युटीपार्लर मधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0
13

नागपूर,दि.20- पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला.सदर परिसरातील अंजुमन कॉम्प्लेक्सच्या शेजारील इमारतीत शहनाज हुसेन हर्बल मसाज व ब्युटी पार्लर नावाने एका दुकानात हा धंदा सुरु होता. या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दुकानावर धाड मारून तीन मुलींची सुटका केली.हे दुकान ६२ वर्षीय निर्मल कौर सिंग यांच्या मालकीचे असून पैशाचे आमिष देऊन मुलींना सेक्स रॅकेटच्या या धंद्यात ती ओढत होती.पोलिसांनी निर्मल कौर सिंग यांच्या विरुद्ध पीटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.हि कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सोनाली पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली.