परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू

0
7

गोंदिया, दि.२१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक कक्ष अधिकारी (पूर्व) परीक्षा-२०१६ येत्या ३१ जुलै रोजी होणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. बी.एन.आदर्श सिंधी विद्या मंदिर हायस्कूल मुर्री रोड गोंदिया व एस.एस.गर्ल्स कॉलेज विठ्ठलनगर गोंदिया येथे ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ३१ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात फौजदारी प्रक्रिया संहितेची कलम १४४ चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी लागू केले आहे. या काळात परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात शस्त्र, कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे उदा. कॅमेरा, कॅलक्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, संगणक, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादीचा वापर करण्यास किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
०००००