‘त्या’ जखमी बिबट्याचा मृत्यू

0
7

गोंदिया,दि.22- जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा गावात जखमी अवस्थेत असलेला बिबट्या एका घरात घुसल्याने गावात खळबळ उडाली होती. सुरवातीला बिबट्याला पळवून काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले, मात्र अपयश आल्याने यांची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाला दिली असून दोन तासाचा रेस्क्यु केल्यानंतर या बिबट्याला जेर बंद करण्यात यश आले होते. मात्र बिबट्याच्या शेपटीला जखम झाली असल्याने त्याला उपचारा करीता तिरोडा वन परिक्षेत्र कार्यलयात पशु वैधकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात आले असून जखम गंभीर असल्याने बिबट्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.