राज्य व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी-आ.जैन

0
9

भंडारा,दि.24 : केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. या सरकारने भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मदत केलेली नाही. शेतकर्‍यांच्या धानाला भाव मिळाला नसल्याने बळीराजाचे बोळवण होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेंद्र जैन यांनी केला आहे.
भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची विस्तारीत बैठक आज शुक्रवारला पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हा आरोप लावला आहे. या बैठकीला माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती शुभांगी रहांगडाले, महिला प्रदेश महासचिव सुनंदा मुंडले, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जैन यांनी सरकारने विद्युत बिल वाढविल्यामुळे महिलांच्या घरचा आर्थिक बजेट बिघडला आहे. मागील दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारने बेरोजगारांना नौकरी दिलेल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगारांची फसवणुक झाली आहे. पक्ष वाढीकरीता महिलांनी कार्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मधुकर कुकडे यांनी शरद पवार व खासदार प्रफुल पटेल यांचे विचार प्रत्येक घरात पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी नवीन महिला जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाला नगरपरिषद उपाध्यक्ष कविता भोंगाडे, तुमसर न.प. उपाध्यक्ष सरोज भुरे, जि.प. सदस्य ज्योती खवास, मनोरथा जांभुळे, प्रेरणा तुरकर, रेखा ठाकरे, विजया चोपकर, जुमाला बोरकर, करूणा घोरमारे, मनिषा गायधने, पमा ठाकूर, शुभांगी श्रृंगारपवार, किसनाबाई भानारकर, उर्मिला आगाशे, संगिता सुखानी, अनिता साठवणे, माधुरी देशकर, यांच्यासह महिला कार्यकर्त्याहोत्या. संचालन प्रियदर्शनी शहारे यांनी केले. प्रास्ताविक कल्याणी भुरे यांनी केले तर आभार राजकुमारी बावनकर यांनी मानले.