बुधवारी शाळा, महाविद्यालये बंदचे आवाहन

0
8

शिष्यवृत्तीची उत्पन्न र्मयादा सहा लाख करण्याची मागणी
अमरावती,दि.२4- इतर मागासवर्ग (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची र्मयादा सहा लाख रुपये करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवार, २७ जुलै रोजी शाळा व महाविद्यालये बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रपरिषद पार पडली. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा.दिवाकर गमे व पदाधिकार्‍यांनी सदर माहिती दिली. ओबीसीसाठी नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न र्मयादा शिष्यवृत्तीसाठीही लागू होते. अनेक आंदोलनानंतर शासनाने नॉनक्रिमीलेअरची र्मयादा साडेचार लाख रुपयांवरुन सहा लाख रुपये केली. त्याचवेळी उत्पन्नाची र्मयादा मात्र साडेचार लाख रुपयेच ठेवली आहे.त्यामुळे ही र्मयादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवावी व अन्य समस्याही सोडवून ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी बुधवारी समता परिषदेसह डेमोक्रेटीक युथ फ्रंट व अन्य ओबीसी संघटनांच्यावतीने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पत्रपरिषदेत अँड़ बाबुराव बेलसरे, अँड़ नंदेश अंबाडकर, संजय मापले, योगीराज घोटीकर, सुनील वासनकर, राजश्री जढाळे, मिना बकाले आदी उपस्थित होते.