बुधवारचा शाळा कॉलेज बंद यशस्वी करण्यासोबतच महाधिवेशनावर चर्चा

0
9

महेश मेश्राम
आमगाव,दि.२४-ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आयोजित रविवारला येथील qकडगीपार स्थित डोयेवाडा येथे झालेल्या बैठकीत २७ जुर्ले चे शाळा महाविद्यालय बंद आंदोलन यशस्वी करण्यासोबतच ७ ऑगस्टच्या नागपूर महाधिवेशनात ओबीसी युवकांना सहभागी करून घेण्यावर चर्चा करण्यात आली.सोबतच आमगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीची निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते.तर मार्गदर्शक म्हणून डॉ.शशांक डोये,सीसीएफ डी.डी.पटले,ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोजंक खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,विनायक येडेवार उपस्थित होते.या बैठकीत ओबीसी शिष्यवृत्तीचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यासोबतच क्रिमीलेअर मर्यादा वाढीचे शासन निर्णय त्वरित काढण्याचा मागणीला घेऊन महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आयोजित शाळा कॉलेज बंद आंदोलनाला पाqठबा देत आंदोलन यशस्वी करण्यावर उपस्थित सर्वच ओबीसींनी विचार व्यक्त केले.तसेच विदर्भस्तरावरील नागपूर येथे होणारे ओबीसी महाअधिवेशन हे आपल्या समाजातील शिक्षित नोकर पेशातील वर्ग आणि युवकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने या महाधिवेशनाला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बबलू कटरे यांनी केले.बैठकीमध्ये ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व म्हणजेच आरक्षण मिळावे.ओबीसी आरक्षण निरस्त करणारे असंवैधानीक नॉनक्रीमीलेअरची अट रद्द करणे.ओबीसींची जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी सरकारने घोषित करणे.ओबीसींनी वर्णवादी संघटनांमध्ये आपली ऊर्जा खर्र्च न करता स्वतःच्या समाजहितासाठी करणाèया बहुजन चळवळीत सहभागी व्हावे.ओबीसी प्रतिनिधींना घेराव घालून नचीअप्पन रिपोर्ट लागू करण्यासाठी दबाव वाढविणे.सामाजिक दबाव निर्माण करण्यासोबतच ओबीसी विचार असलेल्या नेतृत्वाला मत देऊन आपली राजकीय शक्ती येत्या नगरपरिषद,नगरपंचायत,जिल्हा परिषद व महानगरपालिकेत निर्माण करून शासनावर दबाव आणून आपले प्रश्न सोडवणे आदी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.याचवेळी ओबीसी संघटना गावखेड्यापर्यंत नेऊन शेतकरी,विद्य्रार्थी,नोकरदारवर्गाला जोडण्याची मोहीम राबविण्यावर भर देण्यात आले.
या बैठकीत आमगाव तालुका ओबीसी सेवा संघाच्या अध्यक्षपदी हरीश ब्राम्हणकर तर ओबीसी संघर्ष कृती समितीच्या अध्यक्षपदी लीलाधर गिर्हेपुंजे यांनी निवड करण्यात आली.बैठकीला डी.यु.बिसेन,ए.जे.शेंडे,दिनेश तिरेले,महेश मेश्राम,मुरलीधर करंडे,राधाकिसन चुटे,तुषार पटले,ए.आर.बहेकार,मुकेश पडोळे,प्रशांत गायधने,भुमेश शेंडे,रोहित हत्तीमारे,मुकेश उके,डॉ.संतोष येवले,प्रदुम्न महारवाडे,अ‍ॅड.एम.डी.बागडे,जे.के.जिबकाटे,रामेश्वर बागडे व मोरेश्वर हत्तीमारे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.