वेगळ्या विदर्भासाठी साकोलीत बैठक

0
10

साकोली,दि.26-आता जनतेने वेगळ्या विदर्भाची भाषा बोलायला हवी. विदर्भ वेगळा हवा कि नको, ह्यावर जनतेच्या प्रतोक्रिया उमटायला हवी ही भूमिका ठेवून वेगळ्या विदर्भाच्या मागणीत चैतन्य निर्माण करण्यासाठी “विदर्भ राज्य आघाडी” सरसावली आहे.यासाठी साकोली येथील हनुमान मंदिर येथे संघटन बांधणी करिता घेण्यात आलेल्या सभेला प्रवीण भांडारकर, दीपक जांभूळकर, दीपक क्षीरसागर सहित वार्डातील उल्हास क्षीरसागर, प्रीतम सूर्यवंशी, मनीष क्षीरसागर, शैलेश सूर्यवंशी, रोहित वाडीवे आशिष गहाणे, राजू लांजेकर, गणेश पुस्तोडे, जयेश कापगते, विवेक क्षीरसागर, वृशिकेश कापगते, योगेश गिर्हेपुंजे, राज मस्के, गणेश सूर्यवंशी, पुनीत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, सुनील गहाणे व इतर उपस्थित होते.
यावेळी आजवरचा आपला अनुभव असाच आहे कि कुणीही राजकारण करतो तेव्हा त्याचा मुख्य उद्देश पैसाच असतो. महा-अधिवक्ता पदाची तीन वर्षे बाकी असूनही वेगळ्या विदर्भाच्या मोहिमेला खंड पडू नये म्हणून, आणि विरोधकांसाठी राजीनामा देण्याची गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी समजावूनही अने साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पदावर राहून त्यांना रग्गड पैसा कमावता आला असता. विदर्भ प्रेमापोटी पैसा आणि पदाला डावलणारे अने साहेब म्हणूनच ह्याच कारणाने आम्हाला आदर्श ठरले, म्हणून आम्ही आज विदर्भ राज्य आघाडी च्या संघटन बांधणीकरिता कामाला लागलो. हे संघटन दिवसेंदिवस पर्वतायेवढे विशाल होईल यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. पण जनसामान्यांची साथ मिळाली तर विदर्भ वेगळा व्हायला उशीर लागणार नाही असे विचार राकेश भास्कर यांनी व्यक्त केले.