निधीच्या उपलब्धतेनुसार जंगमुरकुटडोह ते दलदलकुही रस्त्यांचे काम होणार-ना.भुसे

0
10

मुंबई, दि.27 : ग्रामविकास विभागाकडे असलेल्या उपलब्ध निधीच्या उपलब्धतेनुसार रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जंगमुरकुटडोह ते दलदलकुही या रस्त्यांसदर्भातला प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य संजय पुराम, जयदत्त क्षीरसागर यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता.
भुसे म्हणाले की, अतिरिक्त केंद्रीय सहायता निधी या योजनेअंतर्गत दलदलकुही ते मुरकुडोह हा रस्ता तयार करण्यासाठी 210 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यक कामांची गरज लक्षात घेवून याबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. पुलाची बांधकामे करण्यास जास्त निधीची आवश्यकता असल्याने प्रथम रस्त्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले असून जसा निधी उपलब्ध होईल त्यानुसार पुलाचे बांधकाम करण्यात येईल. याशिवाय 13 किमी लांबीच्या रस्त्याचे खडीकरणाचे व
त्यावरील मोऱ्या आणि रपटा बांधकामासाठी अंदाजपत्रकात असलेल्या तरतुदीप्रमाणे काम करण्यात आले आहे.