सालेकस्यात मारहाणीच्या घटनेला जातीयतेचे स्वरूप

0
8

राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप : व्यापाèयांचे पोलिस निरीक्षकांना निवेदन
गोंदिया,दि.१ : दोन वर्षांपासून झेरॉक्सच्या दुकानाची उधारी देण्यास टाळाटाळ करणाèया राजेंद्र बडोले यांना पुजा झेरॉक्सचे मालक गिरजाशंकर मेंढे यांनी पैशाची मागणी करीत मारहाण केली. मात्र, राजेंद्र बडोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सालेकसा पोलिसांनी अ‍ॅटॉसिटींतर्गत गुन्हा दाखल केला. उधारीचे प्रकरण पोलिस निरीक्षकांना देखील माहित असतानाही पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी दाखल केल्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करण्यात येत आहे. असा आरोप सालेकसा तालुक्यातील व्यापाèयांनी केला. यासंदर्भात रविवारी(ता.३१) शहरातून मोर्चा काढून पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
गिरजाशंकर मेंढे यांचे सालेकसा येथे पुजा झेरॉक्स नावाने स्टेशनरीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातून पूर्ती पब्लीक स्कूलचे संस्थापक राजेंद्र बडोले यांनी दोन वर्षांपूर्वी साहित्य खरेदी केले. ते साहित्य उधारीवर खरेदी केले. उधारीचे १ लाख ७४ हजार रुपये राजेंद्र बडोले यांच्याकडे होते. वारंवार पैशांची मागणी करून देखील राजेंद्र बडोले यांनी पैसे दिले नाही. त्यामुळे गिरजाशंकर मेंढे यांनी तालुक्यातील राजकीय मंडळींकडे धाव घेतली. सालेकसा पोलिस ठाण्यात १४ ऑगस्ट २०१५ रोजी तक्रार देखील दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षकांनी दोन्ही पक्षांना बोलावून समज दिली होती. राजेंद्र बडोले यांनी टप्प्याटप्प्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अद्याप पैसे परत केले नाही. दुकानाकडे फिरकणे देखील बंद केले. माझे पैसे परत कर, असे म्टले असता राजेंद्र बडोले यांनी कशाचे पैस्े असे म्हटल्यामुळे गिरजाशंकर मेंढे यांनी २८ जुलै रोजी राजेंद्र बडोले यांना मारहाण केली. परंतु, राजेंद्र बडोले यांनी जातीवाचक शिविगाळ करुन जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सालेकसा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा राजकीय सूड बुद्धीतून असल्याचा आरोप करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा. व्यापाèयांना संरक्षण देण्यात यावे, या मागणीला घेवून तालुक्यातील व्यापाèयांनी रविवारी(ता.३१) शहरातून मोर्चा काढून पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. या घटनेमुळे तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सत्य परिस्थिती जाणून घेवून खोट्या गुन्ह्यांत अडकविणारे आणि त्यांना सहकार्य करणाèयांवर कठोर कारवाई करावी. सालेकसा रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालाची जिल्हा शल्यचिकीत्सकांकडून पुनःचौकशी करावी. या घटनेला अनुसरून पालकमंत्री-पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांच्यात झालेल्या संवादाची कॉल डिटेल्स तपासण्यात यावे. प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास व्यापारी आघाडी आणि नागरिक आपली भूमिका स्पष्ट करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदनाची प्रत शासन आणि प्रशासनातील वरिष्ठांना पाठविण्यात आली. यावेळी भोजराज टेंभरे, भाऊराव मोटघरे, विनोद अजमेरा, सुरेंद्र असाटी, राजेश अग्रवाल, दौलत अग्रवाल, रजींदर भाटिया, सुरेंद्र असाटी, नरसिंह कापसे यांच्यासह शेकडो व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.