डेप्युटी अभियंत्यासह शाखा अभियंता जाळ्यात

0
21

चंद्रपूर,दि.01- नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज सोमवारला चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यासह शाखा अभियंत्याला लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे.त्यामध्ये उपविभागीय अभियंता जगदिशकुमार जाधव व शाखा अभियंता जिवनदास नारनवरे यांचा समावेश आहे.शाखा अभियंत्याने गडचांदूर येथील एका कंत्राटाराकडून स्वतसाठी व उपविभागीय अभियंत्यासाठी मिळून 3 लाख 20 हजार रुपयाची लाच मागितली होती.परंतु कंत्राटदारास सदर रक्कम देण्याची मूळीच इच्छा नसल्याने नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार नोंदवली.त्यानुसार सापळा रचून 1 लाख 80 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले त्यानुसार ही रक्कम आज स्विकारतांना दोघांनाही अटक करण्यात आली.