सावली ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी करा

0
8

ग्राम पंचायत सदस्यांसह नागरिकांचे प्रशासनाला साकडे
गोंदिया- देवरी तालुक्यातील सावली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने काही पदाधिकाèयांना हाताशी धरून बोगस मजुरांच्या नावे निधीची विल्हेवाट लावल्याचा आरोप लाभार्थी नागरिकांसह ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी केला आहे. याविषयीची लेखी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि स्थानिक आमदार यांचे कडे करण्यात आली आहे.
सविस्तर असे की, सावली ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकाने गेल्या जून महिन्यात १४ वित्त आयोगाच्या निधीतूनदुर्बल घटकातील लाभाथ्र्यांसाठी विस्तारित पाइप लाइनचे काम पंढरपूर येथे केले. याशिवाय नळयोजनेत विस्तारीकरणाचे दुसरे काम सुद्धा केले. या दोन्ही कामावर जून महिन्यात दोन वेगवेगळे मजुरांचे हजेरीपट नोंदवून मजुरी वाटपात घोळ केला. उल्लेखनीय म्हणजे दुर्बल घटक योजनेतील लाभाथ्र्यांनी पाइपलाइनचे खोदकाम स्वतः केले तर दुसèया विस्तारीकरणाचे काम हे जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आले. विशेष म्हणजे एकाच वेळी हे मजूर दोन्ही ठिकाणी दाखवून मजुरी लंपास केल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य डुडेश्वर गहाणे आणि छन्नेश्वरी वैद्य या ग्राम पंचायत सदस्यांसह आत्माराम मेश्राम, शालिकराम मेश्राम, संतोष शहारे, श्यामलाल राऊत, सदाराम राऊत, खेमराज मेश्राम, तुकाराम मेश्राम, मंसाराम राऊत, कमला सोनवाने, सुनील सोनवाने, गुलाब मरस्कोल्हे, सुभाष येशनसुरे, बबन राऊत, मुक्ता राऊत यांनी आपल्या लेखी तक्रारीतून केला आहे. याशिवाय बाजारओटे दुरुस्ती कामातही अनियमितता असल्याचे ग्राम पंचायत सदस्यांचे म्हणणे आहे.