आमदार पुरामाच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे रविवारला आयोजन

0
6

गोंदिया,दि.4-आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या रविवारला(दि.7) शासकीय आश्रमशाळा कडीकसा ता.देवरी येथे व आमगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कालीमाटी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.श्री स्वामी समर्थ नेत्रालय,नागपूर,जिल्हा अंधत्व निवारण समिती गोंदिया व आ.सजंय पुराम मित्र परिवाराच्यावतीने मोफत नेत्र तपासणी,चष्मे वितरण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे उदघाटन भाजप जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांच्या हस्ते तालुका भाजपा अध्यक्ष प्रमोद संगिडवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती देवकीताई मरई,जि.प.सदस्य अल्ताफ हमीद मेमन,जि.प.सदस्य सरिता रहागंडाले,प.स.सदस्य महेंद्र मेश्राम,मेहतलाल कोराम,गणेश तोपे,सुनंदाताई बहेकार,सरपंच दुर्गाताई कल्लो,विनोद भाडांरकर,प्रविण दहिकर,अनिल येरणे,दिलीप अंबरवाडे,राजु शाहू व नुतनताई कोवे उपस्थित राहणार आहेत.या आरोग्य शिबिराचा लाभ जनतेने अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून घ्यावे असे आवाहन सविता संजय पुराम,हुकूम बोहरे,युवराज पटले,विद्यासागर पारधी,अनिरुध्द शेंडे,संजय मेंढे,रोशन फरकुंडे,गुणेश्वर हत्तीमारे,लक्ष्मण सोनसर्वे,रामेश्वर बनसोड,मन्नुलाल मडावी,निखिल झिंगरे व मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.