ओबीसीच्या हितासाठी हीच संघर्षाची खरी वेळ-आ.रवी राणा

0
9

नागपूर-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आयोजित ओबीसी महाधिवेशनाच्या व्दितीय सत्रातील ओबीसी शिष्यवृत्ती व नाॅन क्रिमिलेयर समस्या आणि एकविसाव्या शतकातील ओबीसी युवकासमोरील आव्हाने या विषयावरील परिसवंदात बोलतांना बडनेराचे आमदार रवी राणा म्हणाले की,या ओबीसी महाधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जोडण्याची प्रकिया सुरु झाली आहे.जातपातीच्या राजकारणात आपण ओबीसी आहोत हे काही लोकांच्या षडयंत्रामुळे विसरुन गेलो आणि त्यााचाच लाभ घेत उच्चवर्णीयांनी आमच्या युवकांच्या नोकरीसह शिक्षणातील अधिकार हिरावून घेतले.
गेल्या 60-65 वर्षापासून सातत्याने ओबीसीवर अन्याय होत आला असून गेल्या दोन तिन वर्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,त्यामुळे अोबीसी समाजाला संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नाही.आमच्या मतावर आणि भऱोश्यावर असलेले सरकारच आमच्या विरोधात जात असेल तर गप्प बसून काही होणार नाही,तर लढा देण्याची वेळ आली आहे.आजही आमचा ओबीसी शेतकरी,शेतमजुर आत्महत्या करतोय कर्जाच्या खाईत लोटला आहे त्याला कुठल्याही सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाहीत.त्यामुळे पुर्ण ताकदिने आणि तळमळीने या हक्काच्या लढ्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आल्याचे विचार बडनेराचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री कुणीही असो आपल्या मागण्यासांठी लढा देणे आपले काम आहे.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.जेमिनी कडू होते.तर प्रमुख वक्ते म्हणुन अॅड.गणेश हलकारे,प्रा.शेषराव येलेकर यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा,आमदार सुनिल केदार,प्राचार्य आर.जी.टाले,प्रा.दिवाकर गमे,प्रा.अरुण पवार, रविकांत बोपचे,नितिन मते,दिनेश चोखमारे,डाॅ.राजेश ठाकरे,भुषण दडवे आदी मान्यवर उपस्थित होते.