मराठा सेवा संघातर्फे किसान आजादी आंदोलन

0
11

गोंदिया,दि.9:- मराठा सेवा संघ गोंदिया जिल्हा शाखेकडून ९ आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर किसान आजादी आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र माने यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते यांना निवेदन देण्यात आले. शेतक-यांचे जिवन जगने कठीन करणा-या व्यवस्थेचे विरूध्द केला गेलेल्या ह्या आंदोलनात शेतक-यांना सरळ कर्जमुक्ती देउन सात बारा कोरा करणे, शेतक-यांना उत्पादन खर्च आधारित आणि वेतन आयोगानुसार हमीभाव भाव देणे, जेथे गाव तेथे गोडावून ही योजना गावपातळीवर राबवण्यात यावी, ५८ वर्षानंतर निवृत्ती वेतन किंवा उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा, खते बियाणे, किटकनाशक कंपन्याचे राष्टÑीयकरण करावे, शेतक-यांना खाते, बियाणे बिन व्याजी देण्यात यावे, शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग पातळीवर उभारावा, शेतक-यांना शेतीपुरक जोड धंद्या करण्यासाठी दिर्घ मुदतीचे कर्ज देण्यात यावे शेतक-यांना मुलांना नोकर भरती व पदोन्नतीध्मये ५० टक्के आरक्षण देण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारांनी कृषी साठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करावा, गोधन पाळण्यासाठी शासनातर्फे गौपालन भत्ता देण्यात यावा, शेती सुविधा केंद्र सुरू करणे, या प्रमुख मागण्यासोबत इतर शेतक-यांसाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोंदिया पंचायत कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. प्रारंभी उपविभागीय अधिकारी नंतर जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा नेण्यात आला. मोर्च्यात उपस्थित शेतक-यांचे मागण्या घेउन मराठा सेवा संधाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र माने,आशिष जुनधरे,गुरूदास गिरीपुंजे, विनीत मोहिते, सविता तुरकर, कुंदा भास्कर, इश्वर चक्रवर्ती, अर्चना नंदागळे, ज्योती डोंगरे, नितीन निखाडे,कलेश्वर ब्राम्हणकर, योगेश शेंडे, बलीराम फुलबांधे, नितीन निखाडे, अरूण चुरे आदी प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नावाने मागण्यांचे निवेदन सादर केले.