पावसाळी पर्यटनाने फुलले हाजराफॉल!

0
13

20160813_143412फेंड्रशिपच्या दिवसी दिली 2 हजार पर्यटकांनी भेट

खेमेंद्र कटरे
गोंदिया : कधीकाळी शासनाच्या दुर्लक्षामुळे उपेक्षीत झालेला हाजराफॉल पर्यटकांच्या हजेरीसाठी रडत होता. आतामात्र पावसाळी पर्यटन केंद्र असलेल्या हाजराफॉलच्या सौंदर्याला ‘चारचांद’ लागल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी राहू लागली आहे.गेल्या आठवड्यात फेंडशिप डे च्या दिवशी तब्बल 2070 पर्यटकांनी एकाच दिवशी या पर्यटनस्थळाला भेट देऊन एक विक्रमी नोंद केली आहे. विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी सुध्दा आपल्या प्रवासादरम्यान या स्थळाला भेट दिल्याचा उल्लेख आढळून येत आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी भेट देण्याची पहिलीच वेळ असल्याची माहिती नवाटोला येथील जे.एफ.एम कमिटीचे सचिव सुरेश रहागंडाले यांनी मटा ला दिली. एकेकाळी या ठिकाणी स्थानिक तालुक्यातीलच पर्यटकांनी पाठ फिरविली होती. परंतु आता मात्र, या क्षेत्राचा कायापालट झाला आहे.विशेष म्हणजे याठिकाणी धबधब्याला जवळून पाहण्याची संधी मिळावी यासाठी झिपलाईन (झुला) सुध्दा सुरु करण्यात आला आहे.विदर्भात अशा प्रकारची सोय असलेले हाजराफाॅल हे पहिलेच असे पर्यटन केंद्र ठरले आहे.यासाठी विशेष करुन हिमाचल प्रदेशातील मनाली व गोवा येथील समुद्रकिनारी प्रशिक्षण देऊन काही तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. 20160813_142928
पुर्व विदर्भात सध्या हाजराफाॅल हे पावसाळी पर्यटन चांगलेच फुलले असून या स्थळाला छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील पर्यटकांनी चांगलीच भुरळ पाडल्याचे चित्र दिसून येत आहे.सोबतच हाजराफॉल अप्रतिम झाल्याने विदेशी पर्यटक देखील या ठिकाणी येवू लागले आहेत. इंग्रजाच्या काळात मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचे बांधकाम करतांना रेल्वेचे इंजिनियर हाजरा यांना या पहाडातून बोगदा तयार करतांना हा नयनरम्य परिसर दिसला तेव्हा त्यांनी बोगदा तयार झाल्यानंतर शेजारुन वाहणार्या नाल्यातील पाण्याला या पहाडावरुन प्रवाह करुन दिला तेव्हापासून हा मनमोहक धबधबा पर्यटनाचा केंद्र ठरला.मधल्या काही काळात या भागात नक्षल चळवळ अधिक तीव्र राहिल्याने हा पर्यटन केंद्र शासन दरबारी उपेक्षित ठरला होता परंतु नतंर हळूहळू शाळकरी मुले याठिकाणी जाऊ लागली आणि पुन्हा हा केंद्र पर्य़टकांच्या मनात घर करु लागला आज हाजराफाॅलच्या पर्यटन विकासात जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यंवशी व उपवनसंरक्षक रामगावकर यांनी इको टुरीझम संकल्पना या जिल्ह्यात राबविण्यास यास्थळापासून सुरवात करुन जिल्ह्याला नवीन पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यात केलेली कामगिरी सुध्दा मोलाची ठरली आहे.
या ठिकाणी येणाNया पर्यटकांना आजुबाजूच्या पर्यटनस्थळाची माहिती व्हावी, यासाठी स्थानिक जे एफ एम कमेटी नवाटोल्याने ५० गाईड नेमले असून त्यात २३ गाईड या मुली आहेत. भविष्यात मार्च नंतरसुद्धा हाजराफॉल येथे पाण्याची व्यवस्था कशी होईल, याचा आराखडा जिल्हा पर्यटन समितीने वनविभागाच्या सहकार्याने करण्यास सुरूवात केली आहे.