रुग्णालय समस्यांना घेऊन बसंत ठाकुरच्या आंदोलनाला प्रतिसाद

0
8

गोंदिया,दि.15-गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर छत्तीसगड व मध्यप्रदेशातील रुग्णासांठी महत्वाचे रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला सामान्य रुग्णालय व कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन सामाजिक कार्यकर्ते बंसत ठाकूर यांनी 14 आॅगस्टपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाशेजारील प.नेहरु यांच्या प्रतिमेशेजारी आंदोलनाला सुरवात केली आहे.ठाकुर यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.ठाकूर यांच्या आंदोलनामूळे मात्र बाई गंगाबाई रुग्णालयातील छपास डाॅक्टरांच्या कामकाजाचे पितळ उघडे पडण्यास सुरवात झाली आहे.गेल्या काही दिवसापुर्वी जोरदार पावसामुळे रुग्णालयात पाणी शिरुन ते वाॅर्डातपोचले होते तरीही रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी व इतर डाॅक्टरानी लक्ष दिले नाही त्या पाण्यातच महिला रुग्णांना रात्र काढावी लागली होती.तर प्रसुतीसाठी येणार्या रुग्णाकडून येथील काही लोक पैसे उकडत असल्याचा आरोप आणि काहींनी या रुग्णालयाला निव्वळ आपल्या प्रसिध्दीसाठीचे बनविले स्थान,रुग्णांच्या नातेवाईकांशी होणारी गैरवर्तणुक ,लुबाडणूक ,रक्तदेतांना घेण्यात येणारे अधिकचे पैसे यासोबतच केटीएसमध्ये असलेले अपुर्या सोयी आदी मागण्यांना घेऊन ठाकूर यांनी आंदोलन सुरु केले आहे.ठाकूर यांच्या आंदोलनाचा धसका खासदार नाना पटोले व पालकमंत्री राजकुमार बडोले यांना सुध्दा घ्यावा लागला.त्यांना त्यांच्या आंदोलन मंडपात जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागली.ठाकूर यांच्या आंदोलनाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला आहे.नगराध्यक्ष कशिश जायस्वाल,बांधकाम सभापती बंटी पंचबुद्दे,नगरसेवक शिव शर्मा,दामिनी संघटनेचे अध्यक्ष,भाजप शहर अध्यक्ष सुनिल केलनका यांच्यासह आदींनी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.