माझा मुलगा मुकेशचा मृत्यू नव्हे तर हत्याच-देवनाथ रहागंडाले

0
16

गोंदिया पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन,सीआयडी मार्फेत व्हावी चौकशी
शिष्टमंडळात क्षत्रिय पवार महासभेसह,पोवार संघटनांचा सहभाग

गोंदिया,berartimes.com ,दि.27- सडक अर्जुनी येथील प्रतिष्ठित वकील म्हणून परिचित असलेले आणि गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले अॅड मुकेश रहागंडाले यांचा मृत्यू नसून त्यांची हत्याच झाली असावी असा आरोप करीत या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन अॅड.मुकेशचे वडील देवनाथ रहागंडाले व आई पुष्पा रहागंडाले यांनी आज शनिवारला(दि.27)गोंदियाचे पोलिस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांना दिले.त्यांच्यासोबत राष्ट्रीय क्षत्रिय पोवार महासभा महासचिव मुरलीधर टेंभरे,पवार युवक संघटना नागपूरचे अध्यक्ष प्रदिप कोल्हे,महासचिव रमेश टेंभरे,कोषाध्यक्ष पृथ्वीराज रहागंडाले, गोंदिया जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे,पवार प्रगतीशील मंचचे प्रा.संजिव रहागंडाले,सडक अर्जुनी पोवार संघटनेचे लिलेश रहागंडाले यांच्यासह सडक अर्जुनी व गोंदिया जिल्हा पोवार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी शिष्टमंडळाचे म्हणने एैकून निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन देत दिलेल्या निवेदनाची दखल घेण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात देवनाथ रहागंडाले व पुष्पा रहागंडाले यांनी आमचा मुलगा अ‍ॅड मुकेश हा गेल्या सहा सात वर्षापासून साकोली हे गाव सोडून सडक अर्जूनी येथे वास्तव्यास होता.मुलाने नागपूरातील मेघा या मुलीशी आंतरजातीय विवाह केला.त्या विवाहाला आमचा विरोध होता.म्हणून त्याने आमच्याकडे न राहता सडक अर्जुनी येथे राहणे सुरु केले.या दरम्यान मुलगा म्हणून आमच्याशी कधी कधी संपर्कात राहायचा.तो आजारी आहे अशी कुठलीही माहिती आम्हाला दिली गेली नाही.उलट मंगळवारच्या (दि.२३) रात्री आमची सून अ‍ॅड मेघा रहागंडालेचा भाऊने रात्री ११ वाजेच्या सुमारास तुमचा मुलगा मरण पावला असे सांगून फोन बंद केला.आम्ही वारंवार फोन करुन काय झाले याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.परंतु काहीच कळेना जेव्हा सकाळी आम्ही सडक अर्जुनीला पोचलो तेव्हा तुमच्या मुलाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे सागंण्यात आले.पण जेव्हा आम्ही मुलाच्या जवळ बघितले तर त्याने विषप्राशन केल्याचे चिन्ह कुठेच दिसून येत नव्हते.त्यामुळे आम्हाला शंका निर्माण झाली आणि डुग्गीपार पोलीसात तक्रार नोंदवून शवविच्छेदनाची मागणी केली.जेव्हा की आमच्या सुनेने विषप्राशन करुन मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर शवविच्छेदनाची तयारी आधीच करायला हवी होती,ती न करण्यामागे काय कारणे होती ही भूमिका संशयास्पद वाटत आहे.त्यातच शवविच्छेदनाची मागणी केल्यानंतरही योग्यप्रकारे शवविच्छेदन झाले नसावे असे आम्हाला वाटत असून शवविच्छेदन अहवालही व्यवस्थित निष्पक्ष येईल की नाही याबाबत शंका असल्याची भूमिका पोलीस अधिक्षकासमोर मांडत असताना मृतकाची आई पुष्पा रहागंडालेंना अश्रू अनावर झाले होते.
मुलाला दोन मुली असून वडील आजारी असल्याची माहिती त्यांना होती का त्या त्या रात्री घरी का नव्हत्या कुणाघरी होत्या याची सुध्दा चौकशी करुन त्या दिवसाचा मुकेशच्या मोबाईलसह सुनेच्या मोबाईल काॅलची सुध्दा तपासणी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.अंत्येष्ठीनंतर सुनेचे वडील चरणसिंह मथुरिया हे आमच्या साकोली येथील निवासस्थानी येऊन तेरवीच्या कार्यक्रमाची विचारणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची माझे चांगले संबध आहेत असे म्हणने आम्हाला कुठेतरी शंकास्पद वाटत असल्याने आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असावी अशी भिती आम्हाला असून आमच्या नातवांच्याही जिवाला धोका असल्याने निष्पक्ष चौकशी करुन आमच्या मुलाच्या आत्माल्या न्याय मिळवून देण्याची विनंती वडील,आई ,बहिणीसह जावयाने केली.
निवेदनात सोमवार (दि.२२) च्या सायंकाळी ५ वाजेपासून ते मंगळवार(दि.२४) सकाळी ९ वाजेपर्यंतच्या सर्व मुलगा,सून यांच्या सर्व मोबाईल कालॅचे डिटेल्स,लोकेशन कुणाकुणासोबत बोलणे झाले याचाही तपास पोलीसांनी करावा अशी मागणी केली आहे.आमचा मुलगा साधा स्वभावाचा होता त्याचे कुणाशीही वाद नव्हते परंतु अचानक असे काय झाले की आमचा मुलाचा मृत्यू झाला.मुलगा आजारी सुध्दा नव्हता जर सडक अर्जुनीवरुन उपचारासाठी भंडारा येथे नेले जात असताना साकोली हे गाव असताना आम्हाला का सांगण्यात आले नाही असे अनेक प्रश्न निवदेनात उपस्थित केले आहे.सोबतच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सकांची सुध्दा याप्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
राष्ट्रीय क्षत्रिय पोवार महासभेचे महासचिव मुरलीधर टेंभरे यांनी येत्या 2 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरात भेटून या सर्व प्रकरणाचे निवेदन नागपूरातील सर्व पोवार संघटनांचे पदाधिकारी देणार असल्याचेही कळविले आहे.