पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले रेंगेपार व सिंदपुरीवासी

0
7

तुमसर,berartimes.com दि.5:तुमसर तालुक्यातील सिंदपूरी येथील तलावाची पाळ फुटल्याने गावातील अनेक घरे भुईसपाट झाली. तर काही शेतकर्‍यांची शेती पडीत झाली. मागिल दोन वर्षापासून सध्या टिनाचे पत्रे व फाटक्या चटईच्या आळूशात तात्पुरता निवारा उभारण्यात आला आहे. मात्र, आजतागायत घरकुल बांधकामाकडे प्रशासनाचे तथा जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. तसेच रेंगेपारच्या पुनर्वसनाच्या मागणी वरून राजकीय पुढार्‍यांनी वैनगंगा नदी घाटात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. तेच आता खासदार व आमदार झालेत परंतु त्यांना सत्ता असतानाही पुनर्वसनाच्या प्रश्न सोडविता आला नसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले यांनी केला आहे.त्यांनी सिंदपुरी गावात पिडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर कार्यकत्यार्ंशी बोलतांनी विचार व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत तालुका कामगार सेना प्रमुख मनोहर जांगडे, तुमसर शहर विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, योगराज टेंभरे, राज तुरकर, राकेश शरणागत, प्रकाश चौधरी, रवि शेंडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
तुमसरच्या निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी सिंदपुरी वासियांची घरकुल व तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांची घोषणा ही फोल ठरली. मात्र लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने आश्‍वासने देवून दुर्लक्ष केले. आजही या बाधित कुटूंबियांना व शेतकर्‍यांना पुनर्वसनाची प्रतिक्षा आहे.
नुकतेच सिहोरा येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी व पुनर्वसनाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी भव्य विराट आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले, या प्रसंगी, शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी संमंधीत सिंदपुरी व रेंगेपार या दोन्ही गावांचा गंभीर पुनर्वसनाचा मुद्दा शासनस्तरावर कार्यवाहिसाठी सादर करण्याचे कळविले, परंतु पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेले गावकरी अजुन कुठपर्यंत वाट पहतील, अशा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.