खासदार दत्तकग्राम पाथरीतील विकासकामात भ्रष्टाचार-नागरिकांचा आरोप

0
15

berartimes.com,गोंदिया,दि.१६ -जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव खासदार दत्तक ग्राम योजनेतर्गंत विकासाकरीत राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतले.त्या गावाच्या विकासासाठी खा.पटेलांनी आपल्या खासदारनिधीसह अदानी फाऊडेंशनच्या सीएसआर व शासकीय योजनेच्या इतर निधीची कामे प्रस्तावित केली. खासदार आदर्श ग्राम पाथरीची निवड प्रफुलभाईंनी करताच संपूर्ण गावकèयांनीही आपूलकीने व एकजुटीने लोक सहभाग दिला.खासदार पटेलांनी घेतलेल्या प्रथम आढावा बैठकीतच तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी आणि पत्रकारांसमोर गावात होणारी विकास कामे दर्जेदार व गुणवत्तेदार व्हावी, अशी सुचना दिली होती.मात्र ग्राम पंचायतीची सत्ता स्वतःकडे काबिज होण्यापुर्वी खा. पटेल यांचे प्रतिनिधी गोरेगाव पंचायत समितीचे सदस्य केवल बघेले यांनी आपुलकीचा ढोंग रचत गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक न घेता निर्विरोध व्हावी,अशी गावकèयांची अपेक्षा असतांना सुध्दा स्वतःचा स्वार्थासाठी गावात स्पर्धात्मक निवडणूका बघेलेंमुळे झाल्या.ग्रामपंचायतीत सत्ता येताच खासदार पटेलांच्या प्रतिनिधी पदाचा दुरूपयोग करून स्वतःचा आर्थिक विकास करण्यासाठी, विकास कामात भ्रष्टाचाराची मर्यादा ओलांडत व नियमांना कायद्याला तिलांजली देत मनमर्जीने हिटलरशाही वागणुक सुरु केल्याचा आरोप पाथरीवासिय नागरिकांनी आज शुक्रवारला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

तसेच खासदार दत्तकग्राम मध्ये झालेल्या मग्रारोहयोतंर्गतच्या कामासह अदानीच्यावतीने करण्यात आलेल्या खोलीकरण कामातील मातीतून सपाटीकरण करण्यात आले आणि त्या सपाटीकरणाच्या माध्यमातून सुमारे १२ लाख रुपयाचा निधीची विल्हेवाट लावत भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपसरपंच संजय कटरे,प्रकाश कटरे,भोजराज कटरे,नाहिद कुरेशी,कुसमन उरकुडे,उमाकांत चन्ने,संजय चन्ने आदींनी केला आहे.तसेच याप्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने येत्या आठ दिवसात न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
इंदिरा आवास योजनेखाली आपले जवळच्या लोकांना जे या पुर्वी लाभ घेवून अपात्र झाले अशांना त्याच दारिद्रयरेषेखालील क्रमांकावर दुसèयांदा लाभ देवून इतर गरजूना लाभापासून वंचित केल्याचेही म्हटले आहे. दलीत वस्ती सुधार योजनेमध्ये ग्रामपंचायत पाथरीचे जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक आल्याने ५ लक्ष रूपयाचे पारितोषिक मिळाले. त्यामध्ये सरपंच व खासदर प्रतिनिधी केवल बघेले यांनी दलीत वस्तीमध्ये कोणतेही काम न करता गा्रमपंचायतच्या समोर बाजार चैकात ग्राउंड व मुख्य प्रवेशव्दार तयार केले. त्यामूळे वार्ड क्र. ३ मध्ये राहणाèया दलित बांधवांवर अन्याय करून शासकिय परिपत्रकास तिलांजली दिल्याचे उमाकांत चन्ने यानी सांगितले. एमआरईजीएस अंतर्गत झालेले विकास कामामध्ये तलाव खोलीकरण,फिश टँक ६,५०,३०० पाथरी, फिŸश टँक भुताईटोला ६,५०,३०० , भुताईटोला दहन भुमी अशोक गौधर्य रस्ता ९,६६,१००, इदगाह सपाटीकरण ६,८५,१००, दरगा सपाटीकरण ९,१२,८०० अदानी तर्फे खोलीकरण ५,४० हजाराचे कामात साप्ताहिक हजेरी पट तयार करतांना दहनभुमी सपाटीकरण भुताईटोलामध्ये ३० ते ३५ मजुरांचे बोगस नावे घालून मजुरीचे पैसे लाटल्याचा आरोप केला.त्याचप्रमाणे तलाव खोलीकरण विकास कामामध्ये अदानीकडून खोलीकरण केले, यात फिश टँक खोलीकरण कामाची माती, सिप्टिंग इदगाह सपाटीकरण दरगाह सपाटीकरण, दहनभुमी सपाटीकरण, इत्यादींवर वापर करून लाखो रूपयाचा भ्रष्चार तांत्रिक अभियंता विजय रहागंडालेच्या माध्यमातून केल्याने तांत्रिक अभियंता विजय रहागंडाले याच्यावर सुध्दा कारवाई करुन नोकरीतून बडतर्फे करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
खासदार निधीतून झालेले सिमेंट कॉक्रींट रस्ते, चिखलावर कांक्रिट बेस न करता ४० एमएम गिट्टी घालून बनवण्यात आले हे सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले.या कामाची पाहणी सुध्दा अभियत्यांने केली नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. आदर्श गाव पाथरी येथे मुख्य विकास समिती बनविण्यात आली. व प्रत्येक वार्ड विकास समिती बनवण्यात आल्या,मात्र गेल्या २ वर्षात कधीच या समित्यांची सभा घेण्यात आली नाही आणि विकास कामे करतांना समितीला विश्वासात घेण्यात आले नसल्याचे सांगत खासदार प्रतिनिधी हे हिटलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला आहे