सात दिवसात कु-हाडी आरोग्य केंद्राला देणार वैद्यकिय अधिकारी

0
11

सीईओ चे आंदोलकांना लेखी पत्र
berartimes.com गोंदिया,दि.22:- स्थायी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी देण्याच्या मागणीला घेउन नागरिकांनी कु-हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोको आंदोलन करण्यात येणार होते. त्यासाठी परीसरातील चार पाच गावातील नागरिकांनी कु-हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एकत्रीत आले होते. या मुद्याला घेउन पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी व उपसभापती सुरेंद्र बिसेन, प.स. सदस्य केवल बघेले यांनी तालूका वैद्यकिय अधिका-याला दिलेल्या अल्टिमेटमची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका२ाी डॉ. पुलकुंडवार यांनी सात दिवसाच्या आत वैद्यकिय अधिकारी कर्मचारी व इतर मागण्या पुर्ण करण्याचे लेखी पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांच्या मार्फत आुंदोलकांना दिले. त्या पत्रानंतर आंदोलकांनी कुलूप ठोको आंदोलन अधिक तीव्र न करता मागे घेतला.  यावेळी पंचायत समिती उपसभापती सुरेंद्र बिसेन, पंचायत समिती सदस्य केवल बघेले, सरपंच संजय आमदे, डुमेश चौरागडे, सुनील लांजेवार, हनीफ शेख, प्रेमचंद गेडाम, भूपेश गौतम, घनशाम पटले, टेकचंद धुर्वे, वहिदभाईपठाण, पोमेश कटरे, कनिराम कटरे, केदारनाथ लांजेवार, होमराज सोनवाने, शिवलाल उके, अरुण मेश्राम, पिंडकेपार सरपंच प्रमिका काटेवार, आसलपाणी सरपंच हेमलता मेश्राम, सुरेश पंधरे, अल्का पारधी, धनेश्वर पारधी, देवानंद कोटांगले, नामदेव वट्टी, एम.जी. नागोसे, हेतराम हरिणखेडे उपस्थित होते.