जिल्हा व ग्रामीण रूग्णालयात ३४९ पदे रिक्त

0
21

खेमेंद्र कटरे,गोंदिया,berartimes.com दि.22-कुंवर तिलकसिंह सामान्य रूग्णालय व जिल्ह्यातील दहा ग्रामीण रूग्णालय एक उपजिल्हा रूग्णालय, बि.जी.डब्ल्यू रूग्णालय व क्षय रूग्णालयाला मंजूर असलेल्या ९११ पदापैकी ३४९ पदे अद्यापही रिक्त आहेत. जिल्ह्याला मंजूर वर्ग १ च्या ३५ पदांपैकी २७ पदे रिक्त वर्ग २ च्या मंजूर ८७ पदापैकी १४ पदे रिक्त, वर्ग ३ च्या ५०६ पदानपैकी १४७ पदे रिक्त आणि वर्ग ४ च्या २८३ पदापैकी १२२ पदे रिक्त आहेत. यातील जिल्हा सामान्य रूग्णालय महत्वाचे रूग्णालय असून वर्ग १ ची १८ पैकी १४ पदे रिक्त वर्ग २ची २९ पदांपैकी ३ पदे रिक्त वर्ग ३च्या २०३ पैकी ६४ पदे रिक्त आणि वर्ग ४ च्या १३५ पैकी ८२ पदे रिक्त असल्याने येथील रूग्णांना योग्य उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होतात. तर बाई गंगा बाई महिला रूग्णालयात १८८ मंजूर पदापैकी ७७ पदे अद्यापही रिक्त आहेत. आणि विशेष म्हणजे हि दोन्ही रूग्णालय शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी अति महत्वाचे आहे.विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकाचे पद अद्यापही रिक्त पडले आहे.त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक रजेवर राहिले तर मुख्य प्रशासकीय व्यवस्था सांभाळणारे अधिकारीच येथे नाहीत.
येथील क्षयरोग कार्यालयाकरीता 31 पदे मंजुर करण्यात आली आहेत.परंतु अद्यापही 13 पदे रिक्त आहेत.तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 45 पदे मंजुर असून 7 पदे रिक्त आहेत.देवरी ग्रामीण रुग्णालयात 26 पदे मंजुर 6 रिक्त,चिचगड ग्रामीण रुग्णालय 26 पदे मंजुर 7 रिक्त,अजुर्नीमोरगाव ग्रामीण रुग्णालय 26 मंजुर 9 पदे रिक्त ,नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात 26 पदे मंजुर 11 पदे रिक्त.सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात 26 पदे मंजुर 11 रिक्त,सालेकसा ग्रामीण रुग्णालयात 26 पदे मंजुर 10 पदे रिक्त आहेत.आमगाव ग्रामीण रुग्णालयात 7 व गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात 2 पदे रिक्त आहेत.रजेगाव ग्रामीण रुग्णालयात 11 व सौंदडच्या ग्रामीण रुग्णालयात 13 पदे रिक्त पडली आहेत.एवढी रिक्त पदे असल्याने आरोग्याचा डोलारा कसा सांभाळला जाईल याचा विचार कुठलाच लोकप्रतिनिधी करतांना दिसून येत नाही.त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.