लोकमान्य गणेशोत्सवाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार वक्रतुंड मंडळाला

0
12
berartimes.com गोंदिया,दि.22 :राज्य शासनाच्या वतीने लोकमान्य सार्वजनिक गणेश उत्सव अभियान नुकतेच राबविण्यात आले. या अंतर्गत जनजागृती करणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना आज पुरस्कार जाहीर करण्यात आले.  जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार तिरोडा येतील वक्रतुंड गणेश उत्सव मंडळाने पटकावला. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय पुरस्कारात गोंदिया शहरातील झगमगाट करणारे एकही गणेश मंडळ येऊ शकले नाही,उलट ग्रामीण भागातील मंडळानी बाजी मारली.
स्वदेशी, साक्षरता,व्यसनमुक्ती, बेटी बचाव, जलसंवर्धन, पर्यावरण स्वच्छता, आदी विषयावर जनजागृती संदेश देणाऱ्या मंडळांना जिल्हा, तालुका स्तरावर पुरस्कार देण्याकरिता शिक्षण विभागाने स्पर्धा घेतली. स्पर्धेच्या निकाल आज गुरुवारी जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार वक्रतुंड गणेश मंडळ तिरोड्याला एक लाख रुपयाचे पारितोषिक जाहिर करण्यात आले.तर व्दितीय पुरस्कार नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी ७५ हजार आणि तृतीय पुरस्कार लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ पुरगाव(गोरेगाव) ने ५० हजार रुपयाचा पटकावला तालुकास्तरीय विजेत्यामध्ये प्रथम गोरेगाव तालुक्यातील बाल समाज मंडळ गंणखैरा, व्दितीय पुरस्कार लोकमान्य उत्सव मंडळ पुरगाव आणि तृतीय सार्वजनिक उत्सव मंडळ हिरडामाली. आमगाव तालुक्यातून प्रथम अष्टविनायक गणेश मंडळ आमगाव, सालेकसा तालुक्यातील प्रथम नवयुवक मंडळ साखरीटोला, व्दितीय श्री साई बाल गणेश मंडळ आमगाव खुर्द, तृतीय पुरस्कार अर्ध नारेश्वरालय हलबीटोला, देवरी तालुक्यातील प्रथम नवयुवक  मंडळ देवरी, व्दितीय ओम जय मेहंदी मंडळ चारभाटा, गोंदिया तालुक्यात प्रथम रामनगर नवयुवक मंडळ रामनगर, व्दितीय श्री अपना गणेश उत्सव मंडळ सिव्हिलाईन आणि तृतीय पुरस्कार मनोहर चौक  गणेश उत्सव मंडळाने पटकावले. तालुका स्तरीय मंडळांना अनुक्रमे प्रथम २५ हजार, व्दितीय १५ हजार आणि तृतीय १० हजार रुयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे . असी माहिती शिक्षण अधिकारी उल्हास नरडं यांनी दिली.