अमित कुमार अग्रवाल :८८ रेल्वेगाड्यात बायो टॉयलेट

0
11

नागपूर,berartimes.com दि..२५ : : स्वच्छता सप्ताहात स्वच्छतेबाबत अनेक उपक्रम राबवून प्रवाशांशी संवाद साधण्यात आल्याची माहिती दपूम रेल्वेचे ‘डीआरएम’ अमित कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेगाड्या आणि परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विभागातील ८८ रेल्वेगाड्यात बायो टॉयलेट बसविण्यात आले असून मोतीबागच्या बायो टॉयलेट युनिटमध्ये या वर्षी २५00 बायो टॉयलेट बनविण्यात येणार असून यातील ९00 बायो टॉयलेट तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
डीआरएम अग्रवाल म्हणाले, स्वच्छता सप्ताहात रेल्वेस्थानक, परिसराची सफाई, सौंदर्यीकरण, वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ स्टेशन दिनी अधिकारी, निरीक्षक, पर्यवेक्षकांनी रेल्वेस्थानकाच्या सफाईची पाहणी करून क्लिनिंग मशीन, टुल्स, प्लान्ट्सचे निरीक्षण केले. यात भारत स्काऊट गाईड, युनियन, विविध संस्था सहभागी झाल्या होत्या.
स्वच्छ रेल्वे दिनानिमित्त विभागातून जाणार्‍या रेल्वेगाड्यांची सफाई करण्यात आली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. स्वच्छ नीर दिनानिमित्त रेल्वेस्थानक परिसरातील पाण्याच्या स्रोतांची सफाई करून पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. स्वच्छ सहयोग दिनानिमित्त प्रवाशांशी संवाद साधून घाण पसरविणार्‍या प्रवाशांना दंड आकारण्यात आला. स्वच्छ संवाद दिनी प्रवाशांशी स्वच्छतेबाबत चर्चा करून पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सिनिअर डीसीएम अर्जुन सिबल आणि अधिकारी उपस्थित होते.

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण तीन अँक्सीडेंट रिलीफ ट्रेन आहेत. यातील एक ट्रेन नॅरोगेज सेक्शनसाठी, एक गोंदिया येथे आणि एक गाडी इतवारी रेल्वेस्थानकावर तैनात आहे. गाडीत अपघात झाल्यास संबंधित ठिकाणी पोहोचून मदत करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यात तीन कोच असून एका कोचमध्ये ऑपरेशन थिएटर, दुसर्‍या कोचमध्ये १२ रुग्णांसाठी बेड, तिसर्‍या कोचमध्ये रुग्णांना खाण्यासाठी पदार्थ बनविण्याची सुविधा आहे. ही गाडी ताशी ११0 किलोमीटर वेगाने धावते. गाडीत ‘व्ही सॅट टेक्नॉलॉजी’चा समावेश आहे. अपघातस्थळी मदतकार्य कसे सुरूआहे याचे थेट प्रसारण डीआरएम कार्यालय आणि रेल्वे बोर्डात पाहण्याची सुविधा असल्याचे मुख्य आरोग्य अधिक्षक डॉ. सुनंदा राहा यांनी सांगितले. याशिवाय एखाद्या पाण्याच्या ठिकाणी अपघात झाल्यास लाईफ ज्ॉकेट, कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक कटर्स, घटनास्थळी हवेने फुलणारा टेंट उभा करण्याची सुविधा या रेल्वेगाडीत उपलब्ध आहे.