गोंदिया व चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात सर्व पदे निर्माण होणार – गिरीष महाजन

0
8

मुंबई, दि. 27 : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा राज्य शासन देत आहेत.रुग्णांना उत्कृष्ट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने  शिक्षण, रुग्णसेवा व संशोधन याना चालना देऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांनी दिली.
            आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वित्तमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्र. वाकोडे, आयुर्वेदचे सहसंचालक वै. श्रद्धा सुडे, विधी व न्याय विभागाचे सहसचवि राजेंद्र सावंत, जे.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता तात्यावर लहाणे यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            श्री. महाजन पुढे म्हणाले की, राज्यात एकूण १६ शासकीय महाविद्यालय, ३ दंत महाविद्यालय व ४ आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच एक रसशाळा कार्यरत आहे. या सर्व महाविद्यालयात उत्तम प्रकारचे शिक्षण व सेवा देण्याच्या उद्येशाने बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांना कालबध्द पदोन्नती / वेतनश्रेणी लागू करण्याबाबत, ग्रामीण भागातील वैद्यकिय महाविद्यालयामधील अध्यापकांना दुप्पटीने व्यवसायरोध भत्ता देण्योबाबत,नियमित व करार पध्दतीने नेमण्यात आलेल्या अध्यापकांना देण्यात येणारा मोबदला वाढवून देण्याबाबत, पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाढविण्याबाबत अतिरिक्त वित्तीय तरतूद करण्याबाबत,संचालनालय वैद्यकिय शिक्षण विभागामध्ये १ महासंचालक, ८ उपसंचालक आणि नेत्र संचालक महाराष्ट्र राज्य अशी पदे निर्माण करण्याबाबत,सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत, संचालक वैद्यकिय शिक्षण अंतर्गत स्वतंत्र सी.एस.आर.कक्ष निर्माण करण्याबाबत, संचालक वैद्यकीय शिक्षण अंतर्गत स्वतंत्र लीगल सेल निर्माण करण्याबाबत, ई-ऑफिस प्रणाली/एच.एम.आय.एस. प्रणाली सक्षमरित्या कार्यरत करण्याबाबत, प्रत्येक वैद्यकिय महाविद्यालयात नोडल ऑफिसर नियुक्ती करण्याबाबत, प्रत्येक वैद्यकिय महाविद्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स सेंटर सुरु करण्याबाबत, गोंदिया व चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये सर्व पदे निर्माण करण्याबाबत, टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ४ विभागात कॅन्सर रुग्णालय सुरु करण्याबाबत,सर ज.जी. रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करिता येत्या ३ वर्षात ६५० कोटी निधी उपलब्ध करण्याबाबत, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दंत विभाग सुरु करण्याबाबत व लागणा-या ४८ अध्यापकांना जागा तसेच लागणारी यंत्र सामुग्री व जागा उपलब्ध करण्याबाबत,प्रत्येक शासकिय महाविद्यालयामध्ये सुपर स्पेशालिटी विभाग सुरु करणे.शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नवीन सुपर स्पेशालिटी विभाग सुरु करणे.इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिसेस हा विभाग सर्व शासकिय महाविद्यालयात पदवीत्तर अभ्यासक्रम म्हणून सुरु करणे इत्‍यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.