बोदलकसा पर्यटनस्थळी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
15

तिरोडा.दि.29,berartimes.com : पर्यटन स्थळ विकास योजना अंतर्गत बोदलकसा येथे बोदलकसा पर्यटन स्थळ रेस्ट हाऊस रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. हे बांधकाम आठ लाख २९ हजार रुपए खर्चाचे आहे. याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी सागितले, पर्यटन स्थळ विकास योजनेतून क्षेत्रामध्ये पर्यटन स्थळ विकसित व्हावे व पर्यटनाला वाव मिळावे. तसेच बोदलकसा, चोरखमारा व केरझरा हे पर्यटनस्थळ नागझिरा अभयारण्याला लागून असून या पर्यटनस्थळांचा विकास करणे गरजेचे आहे.
चोरखमारा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी शासनाकडे १४कोटी रुपए व केरझरा पर्यटनाच्या विकासाकरिता सहा कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. जर या पर्यटन स्थळांचा विकास झाला तर पर्यटनाला वाव मिळेल व बाहेरील पर्यटकांची गर्दी वाढून येथील स्थानिक बेरोजगारांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करणे सुरू आहे, असे आ. रहांगडाले यांनी सागितले.अध्यक्षस्थानी माजी आ. भजनदास वैद्य, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, रमणिक सयाम, पवन पटले, माया रहांगडाले, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, भाजप शहर अध्यक्ष सलाम शेख, कृऊबासचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस, सरपंच प्रभा जांभुळकर, डॉ. दिलीप कोठीकर, डॉ. नन्हासिंग पटले, तालुका महामंत्री पिंटू रहांगडाले, मिलिंद कुंभरे, नीरज सोनेवाने, गणेश बघेले, निलेश बावनथडे, भुमेश्‍वर रहांगडाले, स्वानंद पारधी, कैलाश कटरे, सुधीर येळे तसेच गावकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.