विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-राम नेवले

0
13

 देवरी, कालेश्वर, सिंदखेडराजा, उमरखेड आणि शेंडगाव येथून निघणार दिंडी यात्रा

देवरी, (ता.७)- मध्यप्रांत असताना विदर्भ साधनसंपन्न होता. वैदर्भीय जनतेचे मत विचारात न घेता बळजबरीने नागपूर करार करून विदर्भाला महाराष्ट्रात सामील केले. ‘त्या‘ करारातील एकाही तरतुदीचे पालन महाराष्ट्रवाद्यांनी केले नाही.  याउलट, विदर्भातील नोकऱ्या, सिंचन, वीज, जंगल,पाणी पश्चिम महाराष्ट्रात पळविल्या. त्यांनी विदर्भाची परिस्थिती हलाखीची करून टाकली. अखंड महाराष्ट्राच्या नावावर विदर्भाची लूट सुरू आहे. येथील शेतकरी आत्महत्या करतोय. युवकांच्या हाताला काम दिले जात नाही. आरोग्याच्या सोयी नाहीत. महागड्या विजेमुळे उद्योगाला वाव नाही. सर्वच बाबतीत बॅकलॉग वाढतच चालला. यापुढे सन्मानाने जगायचे असेल, तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही आणि तो घेतल्याशिवाय आता आम्ही स्वस्थसुद्धा बसणार नाही, असे प्रतिपादन विदर्भ राज्य समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी देवरी येथे केले.
देवरी येथे भरत दुधनांग यांच्या निवासस्थानी काल रविवारी (ता.६) सायंकाळी आयोजित कार्यकत्र्यांच्या बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतनबापू राऊत हे होते. यावेळी माजी आमदार आनंदराव वंजारी, आदिवासी नेते भरतसिंग दुधनांग, विदर्भ आंदोलन समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष वासुदेव नेवारे, उपाध्यक्ष क्षीरसागर, युवा आघाडीचे तुषार हट्टेवार, अमरावतीच्या  रंजना मामुर्डे, गोंदिया जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. टेकचंद कटरे, देवरीेचे अ‍ॅड. भूषण मस्करे, अ‍ॅड. गणबोईर, सुरेश भदाडे, इंदल अरकरा आदी मान्यवर उपस्थित होते.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन हिवाळी अधिवेशनात येत्या ५ डिसेंबर रोजी मोच्र्याचे आयोजन विदर्भ राज्य समितीने केले आहे. यासाठी  ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत विदर्भ दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील देवरी, गडचिरोलीतील कालेश्वर, बुलडाणा जिल्ह्यातील qसदखेडराजा, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या पाच ठिकाणांहून qदडी यात्रा काढून ५ डिसेंबरला या दिंड्यांचे रूपांतर विधानसभेवरील मोच्र्यात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी विदर्भात जनजागरण करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन केले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सभेच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना रामरतन राऊत यांनी विदर्भ राज्याची शपथ दिली.
कार्यक्रमाचे संचलन गोंदिया जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. अर्चना नंदघले यांनी केले. यावेळी देवरी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.