वीज ग्राहकांकडे २१६ कोटींवर थकबाकी

0
14

गोंदिया दि.०८: महावितरणच्या गोंदिया परिमंडळाअंतर्गत येणाèया गोंदिया व भंडारा जिल्ह्यात वीज ग्राहकांकडे तब्बल २६१ कोटी १८लाख ४७ हजार ५४१ रुपये एवढी थकबाकी होती. ऑक्टोबर महिन्यात गोंदिया परिमंडळात ४५ कोटी ७८ लाख रूपये वीजेची थकीत रक्कम वसुल करण्यात महावितरणला यश आले. मात्र अनेक मोठ्या वीज थकबाकीदारांवर महावितरणने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
गोंदिया परिमंडळात ६८ हजार ७९२ कृषी पंपधारकांकडे थकबाकीची रक्कम ७३ कोटी आहे. महावितरण गोंदिया परिमंडळाने ही रक्कम ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्व थकबाकीदारांविरूध्द वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र यात मोठ्या थकबाकीदारांपेक्षा सर्वसामान्य थकबाकीदारांना वेठीस धरल्या जात असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे २६१ कोटी थकबाकीपैकी ७३ कोटी २०लाख ९० हजार ६१० रुपयांची थकबाकी कृषीपंपधारकांवर होती. त्यामुळे महावितरण गोंदिया परिमंडळासाठी ऑक्टोबर महिना एक आव्हान होते.या थकबाकीला कंटाळून परिमंडळाने आता कृषी पंपधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्यासोबतच १८८ कोटींची थकबाकी असणाèया इतर वीज ग्राहकांवरही तेवढयाच सक्तीने कारवाई करण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
घरगुती वीज ग्राहकांवरील थकबाकीचे प्रमाण ९ कोटीचा घरात आहे. या वीज ग्राहकाविरूध्द थकबाकीच्या वसुलीसाठी आता विशेष मोहीम राबविली जाणार आहे. थकबाकीचे हे प्रमाण वाणिज्यिक व औद्योगिक वर्गातही बरेच जास्त आहे. या दोन्ही वर्गवारीत थकबाकीची रक्कम २ कोटी ९० लाख ८० हजार ७०७ अशी आहे. कृषी पंपाची २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात एकूण मागणी रुपये ३.४५ कोटीची होती. त्यापैकी फक्त रुपये ८.१३ कोटी वसूल झाले होते. ज्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
मार्च २०१६ अखेर कृषीपंपधारकाकडे असणारी एकूण थकबाकी रुपये ६०.११कोटी एवढया मोठया प्रमाणात वाढली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात मोहीम राबवून ४५ कोटी ७८ लाख रूपयाची वसूली करण्यात आली. यात भंडारा सर्कलला ३४ कोटी ७७ लाखाचे उद्दीट्ये होते. परंतु २७ कोटी ३१ लाख रूपये वसूल करण्यात आले. तर गोंदिया सर्कलला २७ कोटी १९ लाखाचे उद्दीट्ये होते. परंतु १८ कोटी ४७ लाख रूपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत (शहरी भाग), लघुदाब वीज ग्राहकावर १४लाखाच्या वर थकबाकी महावितरण गोंदिया परिमंडळाची आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजना (ग्रामीण भाग) अंतर्गत विज बिलाची थकबाकी १ कोटी ५९ लाखाच्या वर आहे.या वर्गात ११४६ ग्राहक मोडतात. रोजच्या रोज वाढत्या थकबाकीमुळे गोंदिया परिमंडळातील अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.