ओबीसी महामोर्चा यशस्वी करण्याचा चंद्रपूरच्या बैठकील संकल्प

0
19

चंद्रपूर, दि .१६.ओबीसी कृती समिती व ओबीसी समाजात समाविष्ट सर्व जात संघटनेच्या वतीने १६ नोव्हेंबरला  जनता महाविध्यालय नागपूर रोड चन्द्रपूर येथे आयोजित बैठकिला जिल्ह्यातील मान्यवरांनी हजेरी लावून ओबीसी महामोर्चा यशस्वी करण्याचा संकल्प घेतला.या बैठकीत ओबीसी समाजाची जात निहाय आकडेवारी जाहीर करून केंद्रात व राज्यात ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे,ओबीसी विद्यार्थाना १००% शिष्यवृत्ती देण्यात यावी.  प्रत्येक जिल्हात विध्यार्थ्यासाठी वसतिगृह सुरु करण्यात यावे. क्रिमीलेअरची अट रद्द करणे. खा.नच्चीपण कमिशन लागू करणे. मंडल आयोग लागू करणे.स्वामिनाथन आयोग लागू करणे. व इतर मागण्या घेऊन, हिवाळी अधिवेशनावर होणार्या ८ डिसेंबरला २०१६ महामोर्च्याचे मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीला ओबीसी कृती समितीचे निमंत्रक सचिन राजुरकर, dcc अध्यक्ष मनोहर पाऊनकर , माळी समाजाचे अध्यक्ष विजय राउत, अशोक जिवतोडे, अॅड विजय मोगरे, दिनेश चोखारे, देवराव भोंगडे, नंदु नागरकर, बबनराव फ़ड, प्रा अनिल शिंदे , सोमय्या पाॅलीटेन्कीचे पांडुरंग आंबटकर, शिंपी समाजाचे अध्यक्ष संजय टिकले, न्हावी समाजाचे अध्यक्ष शाम राजुरकर,तीरेले कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेंन्द्र खांडेकर, कुभार समाजाचे अॅड माच्चमवार , राहुल पावडे, रवी झाडे, उमाकांत धांडे, प्रभाताई वासाडे, संध्याताई गोहोकर, किरणताई बल्की, चवलेताई, किरण काळे, बबनराव वानखेडे, प्रा बबनराव राजुरकर, नितीन भटारकर, पारस पिंपळकर, गणेश आवारी , डॉ गावतुरे, विजय मुसळे, इटणकरजी, सागर येरणे, सुनील ठावरी, बंजारा समाजाचे विलास मुनावत, सोनार समाजाचे दिलीप कठाने, विनायक साखरकर, चंदु बुरडकर, रवींन्द्र जैयस्वाल c.a, प्रहार संघटनेचे घनशाम येरगुडे, दत्तु कडूकर, विनोद शेरकी,जगन्नाथ आस्वले,प्रवीन चवरे , प्रविन जुमडे, रवी जोगी, नंन्दकीशोर शिरसागर, गजानन कस्टी, निमञक सचिन राजुरकर व समाज बांधवाची ऊपस्थिती होती